Al-Qaeda becomes active expanded operations in Afghanistan
काबूल: एक धक्क्दायक माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा अल-कायदा सक्रिय झाला असून, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)सोबत मिळून प्रशिक्षण केंद्र उघडण्यात आली आहे. एककीकडे पाकिस्तानसोबत युद्ध सुरु असून, दुसरीकडे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून अफगाणिस्तान पुन्हा एकदा दहशतवादाच्या दिशेने जात आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आसा आहे.
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचे जाळे
मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानच्या सत्तेवर येण्याच्या आधी अफगाणिस्तानमध्ये अनेक दहशतवादी गट प्रभावी होते. मात्र, तालिबानने सत्तेवर आल्यानंतर अनेक गटांवर कठोर कारवाई करून त्यांना तडजोड करायला लावली किंवा देशाबाहेर पळवून लावले. संयुक्त राष्ट्राच्या अलीकडील अहवालानुसार, अल-कायदा पुन्हा एकदा आपले जाळे विस्तारत आहे. या अहवालानुसार, अल-कायदा आणि TTP यांनी अफगाणिस्तानमध्ये आपले अभियान मजबूत करण्यासाठी नवीन शिबिरे सुरु करण्यात आली आहे. त्यांनी अफगाणिस्तान आणि इराणदरम्यान त्यांच्या सदस्यांच्या हालचालींना मदत करण्यासाठी 10 प्रशिक्षण शिबिरे, 5 मदरसे, एक शस्त्रास्त्र डिपो आणि अनेक सुरक्षित स्थळे उघडली आहेत.
प्रशिक्षण शिबिरांचे ठिकाण
मिळालेलल्या माहितीनुसार, गजनी, लघमन, परवान आणि उरुजगान प्रांतांमध्ये ही नवीन प्रशिक्षण शिबिरे आहेत. काही शिबिरे तात्पुरती असू शकतात. सध्याच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या 34 प्रांतांपैकी 10 प्रांतांमध्ये ही शिबिरे आहेत. यापूर्वीच्या अहवालांमध्ये हेलमंद, जाबुल, नंगरहार, नूरिस्तान, बदगीस आणि कुनारमध्येही अशा शिबिरांचे संकेत मिळाले होते. या शिबिरांचे संचालन अल-कायदाचा नेता हकीम अल-मसरी करत असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः आत्मघाती हल्लेखोर तयार करण्यासाठी या शिबिरांचा उपयोग केला जात आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या लढणाऱ्यांना या शिबिरांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.
शांततेवर प्रश्नचिन्ह
20 वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर अफगाणिस्तानात शांततेचे वारे वाहू लागले होते. मात्र, या नवीन घडामोडीमुळे देशातील स्थिरतेला धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या सीमांवर आधीच तणाव असून आता देशांतर्गत दहशतवादी गट पुन्हा सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तान आणि शेजारील देशांमध्ये या हालचाली भविष्यात गंभीर संकट निर्माण करू शकतात. अफगाणिस्तानातील ही परिस्थिती संपूर्ण क्षेत्रासाठी चिंताजनक असून, जागतिक पातळीवरही याची दखल घेण्याची गरज आहे.