सैन्य दलावर आत्मघातकी हल्ला, भीषण स्फोटात २७ जवानांचा मृत्यू
अदीस अबाबा: पूर्व आफ्रिकेतील देश इथियोपियाने सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या 164 नागरिकांना लेबनॉनची राजधानी बेरुतमधून परत बोलवले आहे. इथियोपियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. परराष्ट् मंत्रालयाने सांगितले की, या नागरिकांचा अदीस अबाबा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यात आले. परत आलेल्या नागरिकांचे स्वागत इथियोपियाच्या शरणार्थी आणि पुनर्वसन सेवांचे महासंचालक तेइबा हसन आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केले.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी साततत्याने प्रयत्न सुरु
पराराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, इथियोपिया सरकार विविध देशांमध्ये सुरक्षेच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या आपल्या नागरिकांना स्वदेशात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी यावर भर दिला आहे की, सरकार शरणार्थी आणि पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून परदेशात कठीण परिस्थितीत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्येही उथियोपियाने लेबनॉनमधून आपल्या नागरिकांना परत आणले होते.
इथियोपिया आणि सोमालियात द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर
तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले की हा निर्णय परदेशातील आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (IOM) अहवालानुसार, इथियोपियन लोक लेबनानमधील मोठ्या स्थलांतरित समूहांपैकी एक आहेत.
दरम्यान, इथियोपिया आणि सोमालिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा निर्णयही नुकताच घेण्यात आला आहे. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद आणि सोमालियाचे राष्ट्रपती हसन शेख मोहम्मद यांच्यात अदीस अबाबा येथे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दोन्ही देशांनी आपापसातील सहकार्य वाढवून क्षेत्रीय स्थिरतेसाठी मजबूत सहकार्याची गरज व्यक्त केली.
दोन्ही देशांतील संबंध अधिक सुदृढ होण्याची अपेक्षा
दोन्ही नेत्यांनी परस्पर विश्वास, आदर आणि सामंजस्य यांवर आधारित संबंध सुधारण्यावर भर दिला. इथियोपियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, क्षेत्रीय स्थिरतेसाठी समन्वय बळकट करण्याची आणि सामाईक प्रगतीसाठी काम करण्याची ग्वाही दोन्ही देशांनी दिली. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक सुदृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकीकडे परदेशातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याचे सरकारचे प्रयत्न तर दुसरीकडे क्षेत्रीय संबंध सुधारण्यासाठीचे प्रयत्न, या दोन्ही बाबी इथियोपियाच्या प्रगतीशील धोरणांचे दर्शन घडवतात. अशा निर्णयांमुळे देशातील सामाजिक आणि राजकीय स्थिरतेला हातभार लागेल.