Algeria gave ultimatum to 12 French officials to leave the country within 48 hours! Know the reason
पॅरिस: एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फ्रानसच्या 12 अधिकाऱ्यांना 48 तासांत देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश अल्जेरियाने दिला असल्याची माहिती फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी सोमवारी (14 एप्रिल) दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्जेरियात तीन नागरिकांच्या अटकेशी संबंधित हे प्रकरण आहे. यामुळे फ्रान्सकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी म्हटले आहे की, ‘ मी अल्जेरियाला या प्रकरणाच्या चौैकशीचे आवाहन केले आहे. परंतु अल्जेरियाने अधिकाऱ्यांना देशातून पाठवण्याचा निर्णय कायम ठेवल्या आपल्याला त्वरित प्रतिसाद देण्याचा पर्याय आहे.
हाकलपट्टी करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना देशातून परत पाठवण्यामागे अमीर बुखोर्स नावाची व्यक्तीचा संबंध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमीर बुखोर्स याला अमीर DZ या नावानेही ओळखले जाते. त्याचे टिकटॉकवर लाखो फॉलोवर्स आहेत. 2016 पासून तो फ्रान्समध्ये राहत होता त्यानंतर त्याला 2023 मध्ये राजकीय आश्रय देण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, 2024 मध्ये पॅरिसमधून त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याच्या वकिलाने दावा केला होता की, राजकीय दृष्टीच्या हेतूने त्याचे अपहरण करण्यात आले आहे.
त्यानंतर फ्रान्सच्या पोलिसांनी 11 एप्रिल 2025 रोजी अमीर बोखोर्सच्या अपहरणाच्या प्रकरणात तीन अल्जेरियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. यापैकी एक वाणिज्य दूतावासाटा अधिकारी होता. या प्रकरणाच्या प्रत्युत्तर दाखल अल्जेरियाने फ्रान्सच्या 12 अधिकाऱ्यांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये फ्रेंच गृहमंत्रालयच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी यावर उत्तर देत अल्जेरियाला इशारा दिला आहे की, “त्यांनी हा निर्णय मागे न घेतल्यास त्यांना याचे गंबीर परिणाम भोगावे लागतील. यासाठी योग्य ती पाऊले लवकरच उचलली जातील.”
इतिहास, पाहता फ्रान्स आणि अल्जेरियातील संबंध वसाहतवाद आणि राजकीय मतभेदांमुळे पहिल्यापासूनच तणावपूर्ण आहेत. दरम्यान आता अधिकाऱ्यांच्या हाकलपट्टीचे हे प्रकरण आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. तसेच फ्रान्समध्ये राजकीय आश्रय घेतलेल्या अल्जेरियन अमीर बोखर्स या मीर डीझेडच्या प्रत्यार्पणाची ही मागणी केली जात आहे.
त्याच्यावर फसवणूक आणि दहशतवादाचे आरोप अल्जेरियाने लावले आहे. अमीरविरोधात सध्या नऊ आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी केले आहेत. अल्जेरियाच्या मते, त्यांच्या नागरिकांना अटक केल्या दोन्ही देशांत द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.