'हमासला संपवू...'; गुप्त पत्रामुळे इस्रायलमध्ये गोंधळ; नेमकं काय लिहलं होत त्यात? जाणून घ्या प्रकरण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: सध्या इस्रायल आणि हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. इस्त्रायली ओलिसांच्या सुटकेची मागणी होत असून अद्यापही हमासने ती मान्य करण्यास नकार दिला आहे. इस्रायल आणि हमासमध्ये जानेवारीत शांतता करारा झाला होता. परंतु 42 दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास नकार दिला. यामुळे इस्रायलने युद्धबंदीचे उल्लंघन करत गाझावर पुन्हा हल्ले करण्यास सुरुवात केली. इस्त्रायलने स्पष्ट केले की, हमास जोपर्यंत सर्व ओलिसांची सुटका करत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच राहतील.
मात्र, हमासने अद्याप सर्व ओलिसांची सुटका केलेली नाही. ओलिसांच्या सुटका आणि त्यांच्या भविष्याची चिंता वाढली आहे. सध्या ओलिसांचे कुटुब त्यांच्या प्रियजनांच्या सुटकेसाठी आणि युद्धबंदीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये माजी मोसाद आणि IDF चे अधिकारी देखील सामील झाले आहेत. या सर्व घटनांदरम्यानच इस्रायला एक गुप्त पत्र मिळाले आहे. या पत्रानंतर इस्त्रायलमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंची चिंता वाढली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिका-इराणमध्ये कराराचा भारताला काय फायदा होईल? वाचा सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार, मोसादचे माजी सदस्य, माजी IDF अधिकारी, डॉक्टर, लष्करी अधिकारी, हवाई दलाचे अधिकारी, आमि राखीव सैनिकांनी इस्रायलला पत्र लिहिले आहे. या पत्रात हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांच्या सुटकेला प्राधान्य देण्याचे आवाहन सरकारला करण्यात आले आहे. मोसाद यांच्या या पत्रावर 250 हून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यानवरुन दिसून येते की, इस्रायलमध्ये, ओलिसांच्या कुटुंबांसह, सामान्य नागरिक आणि लष्करी अधिकारी देखील युद्धाविरुद्ध गेले आहेत.
🔴 Evening Recap #Israel #Palestine
Here are the day’s key developments:
– A US strike in Yemen’s Sanaa province killed five people and wounded more than a dozen others.
– Over 250 former Mossad employees signed a letter, criticising the dismissal of nearly 1,000 Israel Air…
— Middle East Eye (@MiddleEastEye) April 13, 2025
इस्रायलला मिळालेल्या गुप्त पत्रात म्हटले आहे की, “आम्हाला वाटते की सततची लढाई ही ओलिसांच्या आणि सैनिकांच्या जीवनात धोका निर्माण करत आहे. यामुळे हे दु:ख संपवण्यासाठी लवकरात लवकर शांतता करार होणे गरजेचे आहे. आम्ही सरकारला आवाहन करतो की, देशाच्या आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी त्यांनी लवकरात लवकर पाऊल उचलावे.” यावरुन लक्षात येते की, युद्धबंदी संपवण्यासाठीची मागणी करण्यात आली आहे.
हे पत्र मिळाल्या नंतर पंतप्रधाना नेतमन्याहू आता काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे गाझातील हल्ले थांबणार का? सर्व ओलिसलांची सुटका होणार का? आणि इस्रायल-हमासमध्ये युद्धबंदी लागू होणार का असे प्रश्न उपस्थित होतात.