
America is trying to spoil relations with India China is angry with the Pentagon report
Pentagon report on China India relations 2025 : जागतिक राजकारणात भारत (India), चीन (China) आणि अमेरिका (America) या तीन देशांमधील संबंधांनी आता एक नवे वळण घेतले आहे. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’ने नुकताच अमेरिकन काँग्रेसला एक खळबळजनक अहवाल सादर केला आहे. या अहवालात चीनच्या भारताबाबतच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या अहवालामुळे चीन प्रचंड संतापला असून, अमेरिकेने भारतासोबतचे आमचे संबंध बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक हा खोटा अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप चीनने केला आहे.
पेंटागॉनच्या मते, चीनचे दीर्घकालीन ध्येय २०४९ पर्यंत ‘चिनी राष्ट्राचे महान पुनरुज्जीवन’ साध्य करणे आहे. यासाठी चीन केवळ आपला जागतिक प्रभाव वाढवत नाही, तर युद्धे जिंकू शकेल असे ‘जागतिक दर्जाचे सैन्य’ तयार करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अहवालात म्हटले आहे की, चीनने ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतासोबत एलएसीवर (LAC) जो समझोता केला, तो केवळ एक धोरणात्मक चाल असू शकते. चीनला भीती आहे की भारत आणि अमेरिकेची मैत्री खूप जास्त घट्ट होत आहे, आणि ही मैत्री तोडण्यासाठीच चीन आता भारताशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Prophecy : बायबलमधील ‘नोहा’ परतला? घानामध्ये हजारो लोक Eboh Noaजवळ आश्रय घेताना दिसले, पहा VIDEO
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी या अहवालाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले, “चीन भारताशी असलेले आपले संबंध धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहतो. आम्ही कोणत्याही तिसऱ्या देशाला (अमेरिका) डोळ्यासमोर ठेवून भारताशी मैत्री करत नाही.” चीनच्या मते, अमेरिका आपली संरक्षण भूमिका जगासमोर चुकीच्या पद्धतीने मांडत असून, आशियाई देशांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे.
🚨🇮🇳🇨🇳US nervous about growing India-China ties? A new Pentagon report claims that China ‘seeks to capitalise’ on the the resolution of the Ladakh border dispute to ‘prevent India and US from deepening ties.’ pic.twitter.com/LfeczDNaDQ — Sputnik India (@Sputnik_India) December 24, 2025
credit : social media and Twitter
पेंटागॉनने आपल्या अहवालात एका धोकादायक मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. चीनने अरुणाचल प्रदेश, तैवान, दक्षिण चीन समुद्र आणि सेनकाकू बेटांना आपल्या ‘मुख्य हितसंबंधांच्या’ (Core Interests) यादीत टाकले आहे. याचा अर्थ असा की, या प्रदेशांबाबत चीन कोणतीही तडजोड करणार नाही. अहवालानुसार, चीन आपल्या कम्युनिस्ट पक्षाचे नियंत्रण आणि प्रादेशिक दाव्यांचा विस्तार करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. भारताच्या अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगणे हा याच मोठ्या रणनीतीचा भाग असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Adani Power: PM Modi यांचा एक इशारा आणि बांग्लादेशात होईल अंधारमय; भारताविरुद्ध विष ओकले तर भोगावे लागतील ‘असे’ परिणाम
ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या ऐतिहासिक भेटीचा उल्लेखही या अहवालात आहे. या भेटीनंतर दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे, व्हिसा सुविधा आणि शैक्षणिक देवाणघेवाण यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अमेरिकेला शंका आहे की ही शांतता केवळ तात्पुरती आहे. अमेरिका-भारत संबंधांना गहन होण्यापासून रोखण्यासाठी चीन या ‘शांतता कराराचा’ वापर एक ढाल म्हणून करत आहे. आता या त्रिकोणी लढाईत भारत आपले हितसंबंध कसे जपतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: पेंटागॉनच्या मते, चीन भारत आणि अमेरिकेतील जवळीक रोखण्यासाठी एलएसीवरील (LAC) तणाव कमी करण्याचा धोरणात्मक वापर करत असावा.
Ans: चीनने म्हटले आहे की, अमेरिकेने त्यांचे संरक्षण धोरण विकृत करून मांडले असून अमेरिका मुद्दाम भारत-चीन संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.
Ans: चीनला २०४९ पर्यंत 'चिनी राष्ट्राचे महान पुनरुज्जीवन' साध्य करायचे असून जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य तयार करायचे आहे.