आज येईल महाप्रलय! हजारो लोक Eboh Noaजवळ आश्रय घेताना दिसले, पहा व्हिडिओ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Eboh Noah Ghana flood prophecy 25 December 2025 : आज २५ डिसेंबर, संपूर्ण जग नाताळच्या आनंदात मग्न असताना आफ्रिकेतील घाना देशातून एक अतिशय धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी बातमी समोर येत आहे. स्वतःला ‘आधुनिक काळातील नोहा’ (Modern-day Noah) म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने आज पृथ्वीवर महाप्रलय येईल, अशी भविष्यवाणी केली आहे. या दाव्याने घानामध्ये इतकी दहशत पसरली आहे की, हजारो लोक आपलं घरदार सोडून या व्यक्तीने बांधलेल्या बोटींमध्ये आश्रय घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
सुमारे ३० वर्षांचा हा तरुण स्वतःला ‘एबोह नोहा’ किंवा ‘एबो येशू’ असे म्हणवतो. त्याने दावा केला आहे की, देवाने त्याला दृष्टांत दिला असून २५ डिसेंबर २०२५ पासून पृथ्वीवर मुसळधार पाऊस सुरू होईल. हा पाऊस एखादा दिवस नाही, तर सलग ३ वर्षे चालणार आहे, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी जलमय होईल. बायबलमधील नोहाच्या कथेची पुनरावृत्ती होणार असल्याचा त्याचा दावा असून, केवळ त्याच्या बोटीत बसणारे लोकच जिवंत राहतील, असे तो सांगत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tarique Rahman: 17 वर्षांनंतर ‘डार्क प्रिन्स’चे मायदेशी पुनरागमन; बांगलादेशात बदलाचे वारे, भारतासाठी आशा की धोक्याची घंटा?
एबोह नोहाने गेल्या काही महिन्यांपासून अतिशय वेगाने १० मोठ्या बोटी बांधल्या आहेत. या बोटींचे स्वरूप बायबलमधील ‘नोहाच्या जहाजा’सारखे (Noah’s Ark) आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत आहे की, लोक घाबरलेले आहेत आणि या बोटींमध्ये आपली जागा सुरक्षित करण्यासाठी धावपळ करत आहेत. काहींनी तर या बोटीत राहण्यासाठी आगाऊ पैसे देऊन जागा बुक केल्याचेही वृत्त आहे. एबोह म्हणतो की, “देवाने मला हे जहाज बांधण्याचा आदेश दिला जेणेकरून मी माझ्या अनुयायांना वाचवू शकेन.”
Ebo Noah, a man in Ghana people there call a “prophet,” is building arks to save humanity from a flood. This extinction level catastrophe is said to be happening tomorrow, December 25, 2025. People in Ghana are flocking to the arks in anticipation of the flood. pic.twitter.com/TePpSRjshv — Kentucky Girl (@Notwokenow) December 24, 2025
credit : social media and Twitter
एबोह नोहा याने ऑगस्ट २०२५ मध्ये पहिल्यांदा ‘काय होईल आणि कसे होईल’ या शीर्षकाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. तेव्हापासून तो सतत २५ डिसेंबरच्या विनाशाबद्दल लोकांना सावध करत आहे. त्याच्या मते, ख्रिसमसच्या दिवशी सुरू होणारा हा पाऊस मानवी इतिहासातील सर्वात मोठा विनाशकारी पाऊस असेल. जरी शास्त्रज्ञ आणि हवामान खात्याने अशा कोणत्याही महाप्रलयाची शक्यता फेटाळली असली, तरी स्थानिक लोकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL
जगभरातून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक याला निव्वळ अंधश्रद्धा आणि भीतीचे राजकारण म्हणत आहेत, तर काही जण निसर्गाच्या वाढत्या कोपाकडे पाहून घाबरलेले आहेत. बायबलनुसार, नोहाने ४० दिवस आणि ४० रात्री चाललेल्या महाप्रलयापासून जगाला वाचवले होते. आता एबोह नोहाचा हा दावा किती खरा ठरतो की ही केवळ एक अफवा ठरते, हे आजच्या दिवसाच्या अखेरीस स्पष्ट होईल. तरीही, हजारो लोकांचा जीव धोक्यात घालून बोटींमध्ये झालेली ही गर्दी चिंतेचा विषय बनली आहे.
Ans: एबोह नोहाचा दावा आहे की २५ डिसेंबर २०२५ रोजी महाप्रलय येईल आणि पृथ्वीवर सलग ३ वर्षे पाऊस पडेल.
Ans: प्रलयापासून वाचण्यासाठी एबोह नोहाने १० मोठी जहाजे बांधली आहेत, त्यात बसूनच प्राण वाचतील या विश्वासाने लोकांनी तिथे गर्दी केली आहे.
Ans: तो घानाचा एक रहिवासी आहे, जो स्वतःला देवाने पाठवलेला आधुनिक नोहा मानतो आणि विनाशाची चेतावणी देत आहे.






