America News, Bomb Blast At California Fertility Clinic Kills 1
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी (१७ मे) कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्ज येथील हेल्थ क्लिनिकजवळ बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर किमान पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या हा स्फोट नेमका कोणी केला आणि कसा झाला याचा तपास सुरु आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेची चौकशी सुरु केली असून यामध्ये एफबीआय देखील सहकार्य करत आहे. एफबीआयने दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे.
एफबीआयचे अधिकारी डेव्हिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. सध्या संशयिताची चौकशी सुरु आहे. तसेच या स्फोटात एका मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा मृतदेह स्फोटात पूर्णत: जळून खाक झालेल्या कारजवळ आढळला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी दाव घेतली. अग्निशमन दलाने स्फोटात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
BREAKING: There are multiple casualties and massive destruction after a bomb just exploded near a fertility clinic in Palm Springs, California. pic.twitter.com/G4YkTJTcWK
— Brian Krassenstein (@krassenstein) May 17, 2025
मीडिया रिपोर्टनुसार, स्थानिक वेळेनुसार ११ च्या सुमारास नॉर्थ इंडियन कॅन्यन ड्राइव्ह आणि ईस्यटच ताचेवाह ड्राईव्हच्या भागात हा स्फोट झाली. एफबीआयने दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला असून हा आंतरराष्ट्रीय की देशांतर्गत दहशतवादाचा खटला आहे याची चौकशी सुरु आहे. डेव्हिस यांच्या म्हणण्यानुसार, हा जाणूनबूजून केलेल्या हल्ला आहे. त्यांनी याव्यतिरिक्त कोणतीही माहिती दिलेल्या नाही.
स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून यामध्ये एफबीआय आणि एटीएफ देखील सहकार्य करत आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घटनेनंतरचे दृश्य दिसून आले आहे. यामध्ये अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्स असे या क्लिनिकचे नाव आहे. क्लिनिकचे डॉक्टर माहेर अब्दुल्लाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात क्लिनिकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने सर्व कर्मचारी सुरक्षित आहे. तसेच स्फोटावेळी एकही क्लिनिक एकही रुग्ण उपस्थित नव्हता.