Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण मारणार बाजी? सर्वेक्षणातून आले समोर

US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुक काही दिवसांवर येऊन राहिल्या आहेत. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प व कमला हॅरिस यांच्यात तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 30, 2024 | 02:06 PM
कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण मारणार बाजी? सर्वेक्षणातून आले समोर

कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण मारणार बाजी? सर्वेक्षणातून आले समोर

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुक काही दिवसांवर येऊन राहिल्या आहेत. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी प्रचारात विजयासाठी कंबर कसून मेहनत घेतली आहे. मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी असताना सर्वेक्षणांमधूनही त्यांच्या निकटच्या लढतीचा अंदाज समोर आला आहे.

कमला हॅरिस 1 टक्क्याच्या आघाडीसह ट्रम्प यांच्या पुढे

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार, कमला हॅरिस 1 टक्क्याच्या आघाडीसह ट्रम्प यांच्या पुढे आहेत. या सर्वेक्षणात 44 टक्के जनता हॅरिस यांना मत देण्याच्या विचारात असल्याचे दिसून आले, तर 43 टक्के लोक ट्रम्प यांना मत देण्याची शक्यता आहे. याचबरोबर सर्वेक्षणातून असेही दिसून आले की, कमला हॅरिस (50 टक्के) ट्रम्प (49 टक्के) यांच्यावर थोड्याशा फरकाने आघाडीवर आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हॅरिस यांना 51 टक्के आणि ट्रम्प यांना 47 टक्के मते मिळू शकतात.

हे देखील वाचा- मिशेल ओबामा यांचा कमला हॅरिसला पाठिंबा; तर ट्रम्प यांनी मागितले मुस्लिम आणि अरब मतदारांचे समर्थन

रोजगार आणि अर्थव्यवस्था मुद्द्यांवर अमेरिकन जनतेचा विचार 

अर्थव्यवस्था, रोजगार आणि बेरोजगारी हे मुद्देही या निवडणुकीत महत्त्वाचे ठरत आहेत. 47 टक्के अमेरिकन नागरिकांना ट्रम्प यांचा रोजगार व अर्थव्यवस्थेवरील दृष्टिकोन योग्य वाटत आहे, तर 37 टक्के लोकांच्या मते हॅरिस बेरोजगारीच्या समस्यांवर अधिक सक्षमपणे उपाययोजना करू शकतात असे म्हटले जात आहे.

भारतीय-अमेरिकन्सची पसंती कोण?

या निवडणुकांमध्ये भारतीय-अमेरिकन्स मतदारांचा कल हा महत्त्वाचा मानला जात आहे. एका अहवालानुसार, 10 पैकी 6 भारतीय-अमेरिकन कमला हॅरिस यांना समर्थन देत आहेत. या सर्वेक्षणात भारतीय-अमेरिकन्स मतदारांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थन कायम असले तरी, 2020 च्या तुलनेत ते कमी झालेले दिसते. यंदा 61% भारतीय-अमेरिकन मतदार हॅरिस यांना मतदान करणार असल्याचे माहिती मिळाली आहे, तर 32% मतदार रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांना पसंती दर्शवत आहेत.

स्विंग स्टेट्स या निवडणुकीतील महत्त्वाचे घटक ठरणार

स्विंग स्टेट्स या निवडणुकीतील महत्त्वाचे घटक ठरणार आहेत. अमेरिकेत सात स्विंग राज्ये आहेत, जिथे मतदारांचे कल अजून स्पष्ट नाहीत. या राज्यांतील निकाल शेवटी निवडणुकीच्या अंतिम निकालावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे या राज्यांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत निकराची लढत पाहता, स्विंग स्टेट्समधील निकालच या निवडणुकीच्या विजयाचे गणित ठरवतील, असे मत निवडणूक तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

हे देखील वाचा- व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष; बायडेन यांनी कमला हॅरिसचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा

Web Title: America us election poll update kamala harris or donald trump neck to neck contest nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 02:05 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Kamala Harris
  • US election 2024

संबंधित बातम्या

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
1

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

Strait of Hormuz: ‘तेहरानला घाई…’ होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर घणाघाती हल्ला; 3 मुख्य अटी फेटाळल्या
2

Strait of Hormuz: ‘तेहरानला घाई…’ होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर घणाघाती हल्ला; 3 मुख्य अटी फेटाळल्या

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा
3

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
4

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.