अमेरिकेत F-35 लढाऊ विमान कोसळले (फोटो सौजन्य - X.com)
बुधवारी संध्याकाळी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एक मोठा अपघात झाला. अमेरिकन नौदलाचे एक F-35 लढाऊ विमान नेव्हल एअर स्टेशन लेमूरजवळ कोसळले. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता ही दुर्घटना घडली. अमेरिकन नौदलाच्या म्हणण्यानुसार, विमानातील पायलटने वेळेत पॅराशूटमधून बाहेर पडून आपला जीव वाचवला. नौदलाने जारी केलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये असे सांगण्यात आले आहे की हे विमान स्ट्राइक फायटर स्क्वॉड्रन VF-125 रफ रेडर्सचा भाग होते. हे युनिट फ्लीट रिप्लेसमेंट स्क्वॉड्रन म्हणून काम करते, ज्याचे मुख्य काम पायलट आणि एअरक्रूला प्रशिक्षण देणे आहे.
Canada Plane Crash: कॅनडाच्या न्यूफाउंडलॅंडमध्ये भीषण विमान अपघात; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
लेमूर नेव्हल बेस कुठे आहे?
लेमूर नेव्हल बेस अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात आहे आणि ते फ्रेस्नो शहरापासून सुमारे 64 किलोमीटर नैऋत्येस आहे. जेथे F-35 विमान कोसळले आता प्रश्न पडतो की हे विमान कसे कोसळले?
या अपघाताचे खरे कारण काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकन नौदलाने तपास सुरू केला आहे. या अपघातात इतर कोणताही व्यक्ती जखमी झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. अमेरिकेच्या लष्करी तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपायांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच हा अपघात झाला आहे. F-35 हे जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते, त्यामुळे त्याचा अपघात निश्चितच मोठे प्रश्न उपस्थित करतो.
अमेरिकेची नाचक्की
अमेरिका ज्याला त्याचे सर्वात प्रगत आणि प्राणघातक लढाऊ विमान F-35 म्हणून सादर करते, ते आता रद्दी असल्याचे सिद्ध होत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे, तांत्रिक दोषांमुळे आणि महागड्या देखभालीमुळे या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाची चमक कमी होत चालली आहे. आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे. यापूर्वी भारतातही या जेटने पाश्चात्य तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित केले होते.
14 जून रोजी ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या F-35B विमानाने केरळमधील तिरुवनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. तांत्रिक दोषांमुळे ते विमान एका महिन्यापेक्षा जास्त काळ तेथे उभे राहिले. 6 जुलै रोजी ब्रिटिश अभियंत्यांची एक टीम विशेष सुटे भाग आणि उपकरणे घेऊन आली, त्यानंतरच विमान दुरुस्त करता आले.
बोईंगचा प्रवाशांसोबत जीवघेणा खेळ सुरुच? विमानाच्या इंजिनमध्ये पुन्हा एकदा बिघाड
प्रगत विमानाचे फोटो व्हायरल
तिरुवनंतपुरम विमानतळावर अनेक महिने उभ्या असलेल्या या ‘प्रगत’ लढाऊ विमानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मीम्स बनवण्यात आले आणि अमेरिकन तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. बुधवारी कॅलिफोर्नियामध्ये घडलेला हा एकमेव अपघात नाही. जानेवारी 2025 मधील एका अहवालानुसार, आतापर्यंत F-35 मालिकेतील 11 हून अधिक अपघात झाले आहेत.
F-३५ जेट कधी कोसळले?
FAQs (संबंधित प्रश्न)
१. अमेरिकेत कुठे विमान कोसळले?
अमेरिकेचे F-35 लढाऊ विमान लेमूर नौदल तळाजवळ कोसळले
२. याआधी अशी विमान कोसळण्याची घटना घडली आहे का?
याआधी अशा बऱ्याच विमान कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत