
Maduro's First Hearing in US Court
मादुरो यांच्या अमेरिकेने ड्रग्ज तस्करी, दहशतवादी संघटनांना मदत आणि अमेरिकेविरोधात कट रचल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या तपास संस्थेने दावा केला आहे की, मादुरो यांच्या नेतृत्त्वाखाली काही दहशतवादी गटांनी दक्षिण अमेरिकेमधून अमेरिकेत तस्करीचे जाळे उभारले आहे. यामुळेच अमेरिकेने शनिवारी (03 जानेवारी 20२6) व्हेनेझुएलाची (Venezuela) राजधानी कराकसमध्ये गुप्त करावई अंतर्गत मादुरो यांना अटक केली. तसेच त्यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
दरम्यान मादुरो यांच्या टीमने अमेरिकेच्या या कारवाईला पूर्णपण विरोध केला आहे. तसेच मादुरो यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला आहे की, मादुरो हे व्हेनेझुएलाचे वैध राष्ट्राध्यक्ष आहे. यामुळे त्यांना खटल्यापासून मुक्तता मिळायला हवी. अमेरिकेच्या कायद्यानुसार, कोणत्याही देशाच्या वैध्य राष्ट्राप्रमुखांवर अमेरिकेला खटला चालवता येत नाही, असे मादुरो यांच्या कायदेशीर वकिलांनी म्हटले आहे.परंतु अमेरिका निकोलस मादुरो यांना व्हेनेझुएलाचे वैध्य राष्ट्रप्रमुख मानत नाही. यामुळे त्यांचा हा युक्तिवाद फेटाळला जाण्याची शक्यता आहे.
निकोलस मादुरो यांची कायदेशीर वकिलांची टीम सध्या त्यांच्यावर आरोप बेकायदेशीर असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. पण अमेरिकन न्यायव्यवस्थेसाठी मादुरो सार्वभौम राष्ट्रप्रमुख नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाईची अधिक गडद शक्यता आहे. आज सोमवारी (05 जानेवारी 2026) या प्रकरणाअंतर्गत न्यायलयात काय सुनावणी होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागलेले आहे. या प्रकरणाचा परिणाम केवळ व्हेनेझुएला किंवा अमेरिकेवरच नव्हे, तर अमेरिका-लॅटिन संबंधावर होण्याची शक्यता आहे तसेच याचा जागतिक स्तरावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
Ans: सोमवारी (05 जानेवारी 2026) व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन न्यायालयात ड्रग्ज तस्करीच्या आरोपांखाली हजर करण्यात येणार आहे.
Ans: मादुरो यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला आहे की, मादुरो हे व्हेनेझुएलाचे वैध राष्ट्राध्यक्ष आहे. यामुळे त्यांना खटल्यापासून मुक्तता मिळायला हवी.
Ans: अमेरिका निकोलस मादुरो यांना व्हेनेझुएलाचे वैध्य राष्ट्रप्रमुख मानत नाही, यामुळे मादुरो यांचा दावा फेटाळला जाण्याची शक्यता आहे.
Ans: अमेरिकन लष्कराच्या डेल्टा फोर्सने (Delta Force) 03 जानेवारी 2026 रोजी पहाटे व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे ही कारवाई केली.
Ans: निकोलस मादुरो यांच्यावर नार्को-टेररिझम (मादक पदार्थांची तस्करी), भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी संघटनांना मदत केल्याचे गंभीर आरोप अमेरिकन न्यायालयाने लावले आहेत.
Ans: मादुरो आणि त्यांच्या पत्नीला न्यूयॉर्कमधील एका डिटेंशन सेंटरमध्ये नेण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर खटला चालवला जाईल.