Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नरसंहार करणार नाही’…गाझातील लोकांची अवस्था पाहून व्यथित झालेल्या अमेरिकन सैनिकानं स्वतःला पेटवून घेतलं!

अमेरिकेतील इस्रायली दूतावासासमोर अमेरिकन सैनिकानं आत्महत्येचा प्रयत्न केला. गाझामधील नरसंहार ताबडतोब थांबला पाहिजे आणि त्याचा भाग व्हायचे नाही, असं तो म्हणाला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 26, 2024 | 01:28 PM
‘नरसंहार करणार नाही’…गाझातील लोकांची अवस्था पाहून व्यथित झालेल्या अमेरिकन सैनिकानं स्वतःला पेटवून घेतलं!
Follow Us
Follow Us:

इस्रायल आणि हमास मधील संघर्ष (Israel Hamas War) अद्याप थांबलेला नाही. 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायल आणि हमासमधील होत असलेला हा संघर्ष पाहून व्यथित झालेल्या एका अमेरिकन सैनिकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासाबाहेर अमेरिकेच्या हवाई दलाच्या सैनिकाने स्वतःला पेटवून घेतलं. ‘गाझामध्ये होत असलेल्या हत्याकांडात मी सहभागी होणार नाही’, असं वारंवार म्हणत होता.

[read_also content=”सिनेप्रेमींसाठी खुशखबर! मुंबईतील ‘या’ मेट्रो स्थानकाखाली उभारलं जाणार ‘बॉलिवूड थीम पार्क’ https://www.navarashtra.com/movies/bollywood-theme-park-under-the-metro-line-b2-in-mumbai-nrps-510500.html”]

नेमका प्रकार काय

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव सार्वजनिक करण्यात आलेलं नाही. आत्मदहन केल्यानंतर तेथे उपस्थित सुरक्षा दलांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा व्यक्ती गंभीररित्या भाजली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

आत्महत्या करताना बनवला व्हिडिओ

रिपोर्टनुसार, जेव्हा तो सैनिक आत्महत्या करण्यासाठी दूतावासासमोर पोहोचला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा दलांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी विचारले की ते कोणत्याही प्रकारे मदत करू शकतात का. मात्र, या दरम्यान त्याने स्वतःला पेटवून घेतले.त्याने आत्महत्या करतानाचा व्हिडिओही बनवला होता जो नंतर सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला होता. या दरम्यान तो त्याने सांगितले की तो अमेरिकन हवाई दलाचा सैनिक आहे आणि कॅमेऱ्यासमोर आत्महत्या करणार आहे. गाझामध्ये होणारे अत्याचार तो सहन करू शकत नाही. असंही तो म्हणाला.

या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून ती व्यक्ती सैनिक होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.जर तो सैनिक असल्यास तो अद्याप सेवेत आहेत किंवा निवृत्त झालाय. हे तपसालं जाईल.

जरी अमेरिका गाझामध्ये युद्धविरामाचे समर्थन करत आहे, परंतु 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या UNSC बैठकीत गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळला. अमेरिकेने आपल्या व्हेटो पॉवरचा वापर करून तिसऱ्यांदा हे केले आहे. तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास पॅलेस्टिनींच्या सुरक्षेबाबत अमेरिका, इजिप्त, इस्रायल आणि कतार यांच्यात सुरू असलेल्या चर्चेला तडा जाईल, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ओलिसांनाही धोका होऊ शकतो. आधी हमासशी शांतता चर्चा व्हायला हवी.

Web Title: American soldier sets himself on fire in front of israeli embassy for gaza nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • Gaza

संबंधित बातम्या

Gaza : ‘हमासने लहान मुलांना बनवले मानवी ढाल, तुम्ही ते…’ भारतीय न्यायाधीश S Muralidhar यांच्या रिपोर्टने हादरला इस्रायल
1

Gaza : ‘हमासने लहान मुलांना बनवले मानवी ढाल, तुम्ही ते…’ भारतीय न्यायाधीश S Muralidhar यांच्या रिपोर्टने हादरला इस्रायल

Gaza War Deaths : ड्रोन, स्नायपर आणि बॉम्ब…. गाझातील मुलांसाबोत नेमकं काय घडलं?
2

Gaza War Deaths : ड्रोन, स्नायपर आणि बॉम्ब…. गाझातील मुलांसाबोत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.