
American soldiers to carry drones Pentagon begins new military era
Pentagon drone dominance : अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय अर्थात पेंटागॉनने आपल्या लष्करासाठी एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता प्रत्येक अमेरिकन सैनिकाच्या खांद्यावर बंदुकीप्रमाणे ड्रोन लटकलेले दिसतील. लष्करी युद्धपद्धतीत होत असलेल्या तांत्रिक बदलांमुळे पेंटागॉनने आपल्या सर्व जवानांना किमान २० पौंड वजनाचे ड्रोन नेहमी सोबत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अमेरिकेच्या युद्धशक्तीचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे संकेत आहेत.
‘द वॉर झोन’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पेंटागॉनचे प्रमुख पीटर हेगसेथ यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. त्यांच्या मते, “युद्धभूमीवर ड्रोनची भूमिका आता केवळ साहाय्यक नसून, निर्णायक ठरत आहे.” अशा स्थितीत प्रत्येक सैनिकाला ड्रोनसारखी अत्याधुनिक उपकरणे बरोबर ठेवावी लागणार आहेत. ड्रोन वापरामुळे सैनिक केवळ शत्रूवर हल्ला करू शकतात असे नाही, तर पाळत ठेवणे, सुरक्षा वाढवणे आणि रणनीती आखणे यासाठीही ते उपयुक्त ठरतात. त्यामुळेच आता अमेरिकन लष्करात प्रत्येक जवानासाठी ड्रोन अनिवार्य केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘काझमी बनले सीता, अश्मन झाले राम…’ पाकिस्तानच्या सभागृहात दुमदुमला नामघोष जय श्री राम
सध्या अमेरिकेत ९ लाख ५० हजाराहून अधिक सैनिक आहेत, यापैकी ४.५० लाख सक्रिय कर्तव्यावर आहेत. याचाच अर्थ, भविष्यात लाखो ड्रोन अमेरिकन लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
पेंटागॉनचा हा निर्णय म्हणजे केवळ लष्करी रणनीती नसून एक प्रकारचा जागतिक दबाव निर्माण करण्याचाही भाग आहे. अमेरिकेप्रमाणे इतर देशांनीही जर आपापल्या लष्करात ड्रोनचा वापर वाढवला, तर त्या देशांना अमेरिकेकडून ड्रोन खरेदी करावा लागेल. त्यामुळे अमेरिकेचा जागतिक बाजारपेठेतील दबदबा आणि आर्थिक फायदाही वाढेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोनाल्ड ट्रम्पची ‘FIFA Club World Cup’मध्ये एन्ट्री अन् उडाला गोंधळ… पहा VIRAL VIDEO
पेंटागॉनचा हा निर्णय भविष्यातील युद्धशैलीचे स्पष्ट संकेत देतो आहे. शस्त्रांबरोबरच आता माहिती, गुप्तचर आणि स्वसंरक्षणासाठी ड्रोन अत्यंत आवश्यक ठरत आहेत. लष्कराचा प्रत्येक जवान हा आता केवळ सैनिक नसून एक ‘हवाई तळ’ असणार आहे. हा बदल केवळ अमेरिकेसाठी नाही, तर जगभरातील लष्करी तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे.