
iran protests january 2026 khamenei warning internet shutdown flight cancellation trump
Iran anti-government protests January 2026 : इराणमध्ये (Iran) गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेला सत्ताविरोधी उठाव आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईमुळे चिडलेल्या जनतेने रस्ते व्यापले असतानाच, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी आज राष्ट्राला संबोधित केले. खामेनी यांचे हे विधान अत्यंत कडक असून, त्यांनी आंदोलकांना थेट इशारा दिला आहे. “जे लोक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना खूश करण्यासाठी देशाची मालमत्ता उद्ध्वस्त करत आहेत, त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असे खामेनी यांनी स्पष्ट केले आहे.
इराणमधील हिंसाचार वाढल्याने सरकारने संपूर्ण देशात ‘डिजिटल ब्लॅकआउट’ लागू केला आहे. नेटब्लॉक्सच्या अहवालानुसार, इराणमधील इंटरनेट कनेक्टिव्हिटी ५% पर्यंत खाली आली आहे. या तणावाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय प्रवासावर झाला आहे. दुबई, इस्तंबूल आणि अगदी मुंबईहून इराणला जाणारी डझनभर विमाने ९ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली. ‘फ्लाई दुबई’ आणि ‘टर्किश एअरलाईन्स’ने तेहरान, शिराझ आणि मशहदसाठीची आपली उड्डाणे तूर्तास स्थगित केली आहेत. यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले असून इराणमध्ये नेमकं काय सुरू आहे, हे जगाला समजणे कठीण झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: ‘आम्ही इशारा दिला होता!’ रशियाने युक्रेनवर डागलं ताशी 13,000 किमी वेगाचं क्षेपणास्त्र; युरोप युद्धाच्या छायेत
आपल्या भाषणात खामेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “शत्रूला वाटते की काही भाडोत्री एजंट्सच्या मदतीने ते इराणला झुकवू शकतील. इराण कधीही परकीय दबावापुढे झुकणार नाही. आमचे तरुण आणि सैन्य कोणत्याही साम्राज्यवादी शक्तीला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे.” खामेनी यांनी आंदोलकांना आवाहन केले की, त्यांनी परकीय देशांच्या जाळ्यात अडकू नये, अन्यथा क्रांती रक्षक दल (IRGC) कठोर कारवाई करेल.
🇮🇷🇺🇸 IRAN COMPLETELY ISOLATED. KHAMENEI BLAMES TRUMP WHILE CITIES BURN. TRUMP RESPONDS: NOT BACKING YOUR OPPOSITION LEADER Iran cut off from outside world today. Internet blacked out. Phone calls not reaching country from abroad. At least 6 flights between Dubai and Iranian… pic.twitter.com/iT7XeLUvCa — Mario Nawfal (@MarioNawfal) January 9, 2026
credit : social media and Twitter
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या दडपशाहीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “इराणी लोक अतिशय धाडसी आहेत आणि ते स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. जर या दंगलखोर सरकारने निष्पाप आंदोलकांना मारणे सुरू केले, तर आम्ही शांत बसणार नाही.” विशेष म्हणजे, इराणचे माजी युवराज रझा पहलवी यांना भेटण्याबाबत विचारले असता ट्रम्प यांनी सध्या नकार दिला आहे. “मला वाटते की यावेळी आपण लोकांनी कोणाला निवडावे हे ठरवू द्यावे. कोण नेता म्हणून पुढे येतोय हे आपण पाहू,” असे ट्रम्प यांनी नमूद केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Greenland Strategy: अंतराळातून हल्ला झाल्यास ‘ग्रीनलँड’ बनेल ढाल; 75 वर्षांपासून अमेरिकन सैन्य गोठले बर्फात, वाचा सविस्तर
इराणमधील ढासळत्या परिस्थितीमुळे फ्रान्स आणि युरोपीय महासंघाने इराणला जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सीमेवर रशिया आणि तुर्कीच्या हालचाली वाढल्याने हे प्रकरण प्रादेशिक युद्धाकडे तर जात नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इराणमध्ये आतापर्यंत ४५ हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाल्याचा दावा मानवाधिकार संघटनांनी केला असून २२०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
Ans: आंदोलकांना एकमेकांशी संपर्क साधता येऊ नये आणि सुरक्षा दलांच्या कारवाईचे व्हिडिओ जगासमोर जाऊ नयेत, यासाठी इराण सरकारने देशभर इंटरनेट बंद केले आहे.
Ans: ट्रम्प यांनी सांगितले की, अध्यक्ष म्हणून यावेळी एखाद्या विशिष्ट नेत्याला पाठिंबा देणे योग्य ठरणार नाही. इराणच्या जनतेला त्यांचा नेता स्वतः निवडू द्यावे, ही त्यांची भूमिका आहे.
Ans: इराणमधील सुरक्षा तणाव आणि विमानतळांवरील कनेक्टिव्हिटीच्या समस्यांमुळे तुर्की, दुबई आणि इतर देशांनी खबरदारी म्हणून आपली उड्डाणे रद्द केली आहेत.