Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ देश बनवत आहे जगातील सर्वात घातक 6th जनरेशन ‘F-47’ लढाऊ विमान; 5 महिन्यांपासून गुप्त चाचण्या सुरू

F‑47 stealth fighter : जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज, अमेरिकेचे सहाव्या पिढीतील स्टील्थ लढाऊ विमान F-47 आता आंतरराष्ट्रीय संरक्षण क्षेत्रात खळबळ उडवत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 09, 2025 | 09:27 AM
America's new sixth-generation F-47 stealth fighter jet has been secretly tested for the past 5 months

America's new sixth-generation F-47 stealth fighter jet has been secretly tested for the past 5 months

Follow Us
Close
Follow Us:

F‑47 stealth fighter : जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज, अमेरिकेचे सहाव्या पिढीतील स्टील्थ लढाऊ विमान F-47 आता आंतरराष्ट्रीय संरक्षण क्षेत्रात खळबळ उडवत आहे. हे लढाऊ विमान इतकं अत्याधुनिक आहे की त्याच्यासमोर कोणतीही शत्रूची फौज टिकू शकत नाही. मागील पाच महिन्यांपासून याच्या गुप्त चाचण्या सुरू असून, 2030 पर्यंत हे विमान अमेरिकन हवाई दलाच्या ताफ्यात अधिकृतपणे समाविष्ट केले जाईल.

बोईंग कंपनीसोबत ऐतिहासिक करार

मार्च 2025 मध्ये अमेरिकेच्या हवाई दलाने बोईंग कंपनीसोबत करार करून हे शक्तिशाली एफ-47 लढाऊ विमान तयार करण्याचे ठरवले आहे. विशेष बाब म्हणजे हे विमान F-22 सारख्या जुन्या लढाऊ विमानांची जागा घेणार आहे. या करारामुळे बोईंगला संरक्षण क्षेत्रात नव्याने स्थान मिळाले आहे, जे आतापर्यंत लॉकहीड मार्टिन कंपनीने घेतले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नवा जागतिक संघर्ष उभा राहणार? अंटार्क्टिकामध्ये सौदीपेक्षा दुप्पट तेलसाठा, रशियाच्या दाव्याने जगभरात खळबळ

एफ-47: एक संपूर्ण नवीन पिढीचा युद्धयोद्धा

एफ-47 चे डिझाइन हे पारंपरिक अपग्रेड स्वरूपात नसून पूर्णपणे नवीन आणि आधुनिक आहे. त्यामध्ये दोन अत्यंत प्रगत तंत्रज्ञानांचा समावेश आहे— MQ-28 ‘Ghost Bat’ ड्रोनचे AI आधारित नियंत्रण आणि B-21 रेडरचे स्टील्थ टेक्नॉलॉजी. त्यामुळे हे विमान शत्रूच्या रडारला सहजपणे चकवू शकते.

ट्रंप यांचा मोठा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचे वर्णन “सुपर-कॉम्प्युटरसारखे लढाऊ विमान” असे करताना सांगितले की एफ-47 जगातील एकमेव असे विमान आहे जे फक्त वेगवान आणि प्राणघातकच नाही, तर त्याचे तांत्रिक बुद्धिमत्ता हे त्याचे खरे वैशिष्ट्य आहे.

स्क्वॉड्रन क्षमतेसह एकट्याने लढणारा योद्धा

या विमात इतकी सामर्थ्यशाली प्रणाली बसवण्यात आली आहे की ते एकट्यानेच संपूर्ण स्क्वॉड्रनसारखे काम करू शकते. यामुळे अनेक लक्ष्यांवर एकाच वेळी अचूक हल्ला शक्य होतो. आधुनिक नेटवर्क क्षमतांमुळे ते इतर ड्रोन आणि यंत्रणांशी पूर्णतः समन्वय ठेवू शकते.

किंमत आणि अंदाजे वैशिष्ट्ये

एफ-47 ची किंमत सुमारे २० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १६७ कोटी रुपये आहे. ही किंमत जरी जास्त वाटत असली, तरी ते मिळवणाऱ्या देशासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे विमान युद्धाची रणनीती पूर्णपणे बदलू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता ‘या’ दोन महासत्ता ठरणार मोठ्या महाविनाशामागचे कारण? आता NATO प्रमुखांचेही याबाबत गंभीर भाकीत

F-47

एफ-47 ही केवळ एक लढाऊ यंत्रणा नसून, ती अमेरिकेची भविष्यातील युद्धसज्जता दर्शवते. जेव्हा जगभरातील तणाव वाढतो आहे, तेव्हा अशा प्रकारचे प्रगत विमान शांती राखण्याच्या धोरणातही अत्यंत उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे एफ-47 हे केवळ अमेरिकेसाठीच नाही तर जागतिक लष्करी तंत्रज्ञानासाठीही एक क्रांतिकारी टप्पा ठरणार आहे.

Web Title: Americas new sixth generation f 47 stealth fighter jet has been secretly tested for the past 5 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • America
  • America news
  • Donald Trump
  • international news

संबंधित बातम्या

‘सगळं उद्ध्वस्त केलं…’ , भारतविरोधी धोरणांवर अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे विधान; डोनाल्ड ट्रम्पवर केला संताप व्यक्त
1

‘सगळं उद्ध्वस्त केलं…’ , भारतविरोधी धोरणांवर अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे विधान; डोनाल्ड ट्रम्पवर केला संताप व्यक्त

चीनमध्ये PM मोदी आणि पुतिन यांची दीर्घ बैठक; जाणून घ्या ४० मिनिटांत कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?
2

चीनमध्ये PM मोदी आणि पुतिन यांची दीर्घ बैठक; जाणून घ्या ४० मिनिटांत कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?

‘भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र…’ ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले
3

‘भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र…’ ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO
4

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.