Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

Iran Airlines : अमेरिकेने इराणच्या विमान वाहतूक क्षेत्रावर दबाव वाढवला आहे. इराणी विमान कंपन्यांना परदेशात इंधन, लँडिंग आणि इतर विमानतळ सेवा देणाऱ्या कंपन्यांवर दुय्यम निर्बंध लागू करण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. यामुळे इराणच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रवाशांच्या अडचणीही वाढू शकतात.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 22, 2026 | 05:06 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • इराणी विमानांना ना इंधन ना लँडिंग सेवा
  • २७ इराणी कंपन्यांवर आधीच निर्बंध
  • इराणच्या प्रवाशांसमोर अडचण
Iran Airlines : तब्बल ७ महिने सुरु असलेल्या इराण अमेरिका युद्धाचा शेवट काही केल्या होईल असे दिसत नाही . इस्रायलने अमेरिकेला यात गुंतवून आपला मोर्चा आता गाझा पट्टी आणि लेबनॉन कडे वळवला आहे . आणि आता इराण युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या इज्जतीचा प्रश्न होऊन बसला आहे .

त्यामुळे या ना त्या प्रकारे काहीही करून इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे . त्यातच इराणच्या संपूर्ण प्रवासी आणि मालवाहतूक विमान प्रवासावर बंदी आणण्यासाठी मोहीम आखली आहे . अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी इशारा दिला कि २३ सप्टेंबर पासून इराणच्या विमान कंपन्यांना जगभरातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा चालवणे अत्यंत कठीण होऊ शकते .

परदेशातील विमानतळ , इंधन पुरवठादार , ग्राउंड हॅण्डलिंग कंपन्या आणि तिकीट विक्री करणाऱ्या संस्थांनी इराणी विमान कंपन्यांना सेवा दिल्यास त्यांच्यावर अमेरिकेचे निर्बंध लागू होऊ शकतात .

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

इराणी विमानांना ना इंधन ना लँडिंग सेवा

अमेरीकेच्या म्हणण्यानुसार इराणी विमानं परदेशात कोणत्याही देशात उतरले तर त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा किंवा तिकीट विक्रीसारख्या सुविधा देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा धोका असेल . तसेच अशा कंपन्यांना अमेरिकन डॉलर प्रणालीत प्रवेश रोखला जाऊन त्यांची आर्थिक अडचण निर्माण केली जाऊ शकते .

त्यामुळे अमेरिकेचा आदेश नसतानाही इराणी विमान कंपन्यांना परदेशातील विमानतळांवर आवश्यक सेवा मिळणे कठीण होऊ शकते . असे आंतरराष्ट्रीय वर्तुळात बोलले जात आहे .

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

२७ इराणी कंपन्यांवर आधीच निर्बंध

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने ८ सप्टेंबरला ३६ लक्षांवर निर्बंध जाहीर केले होते . यामध्ये इराणशी संबंधित २७ विमान कंपन्यांवर समावेश होता . अमेरिकेच्या म्हणण्यानुसार इराणच्या विमान वाहतूक क्षेत्राचा वापर शस्त्रे , कर्मचारी आणि इतर प्रतिबंधित माल वाहून नेण्यासाठी केला जात असल्याने ही कारवाई करण्यात आली .

या दबावाचा परिणाम प्रत्यक्ष विमानसेवेवरही दिसू लागला आहे . Mahan Air ने तुर्की आणि ओमानमधील काही आंतरराष्ट्रीय सेवा बंद केल्या आहेत . तुर्कीनेही महान Air च्या सेवांवर निर्बंध आणले आहेत . तर इराकने इराणी विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर बंदी लागू करण्याची तयारी केली आहे .

इराणच्या प्रवाशांसमोर अडचण

इराणची विमान वाहतूक व्यवस्था आधीपासूनच अनेक वर्षांच्या अमेरिकन निर्बंधांमुळे अडचणीत आहे. विमानांचे सुटे भाग, देखभाल आणि नवीन विमाने मिळवण्यावर त्याचा परिणाम झाला आहे. आता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सेवा पुरवठादारांवरही दबाव वाढल्यास इराणमधून परदेशात जाणाऱ्या आणि परदेशातून इराणमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे पर्याय आणखी कमी होऊ शकतात.

 

Web Title: Iran airlines just try flying a plane now us warns iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Airlines
  • America news
  • Iran News
  • Marathi News
  • Top Marathi News Today

संबंधित बातम्या

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
1

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
2

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
3

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?
4

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.