भारतात तशी सणांची काही कमी नाही. विविधतेने नटलेल्या या देशात सर्व धर्मीय गुण्या गोविंदाने राहतात त्यामुळे प्रत्येक सण साजरे केले जातात. आंतराराष्ट्रीय पातळीवर देखील भारतातील सणांचं अनेकांना कुतूहल वाटतं. मात्र असं जरी असलं तरी तरी अमेरिकेतील एका प्राचीन उत्सावाचं आकर्षण बऱ्याच देशांना आहे. अमेरिकेत आणि बऱ्याच देशात एक जाती पंथाचे लोक राहतात त्यामुळे सण उत्सावाचं प्रमाण तसं कमीच आहे. मात्र अमेरिकतला हा प्राचीन उत्सव अनुभवण्यासाठी विविध देशांतून पर्यटक खास अमेरिकेत दाखल होतात. काय हा उत्सव ते जाणून घेऊयात…
अमेरिकेतला हा प्रचीन उत्सव म्हणजे मार्डी ग्रास उत्सव. या उत्सवाची विशेष ओळख म्हणजे ल्युईशिया राज्यातील हा सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव आहे. या
उत्सवाला अनेत वर्षांची परंपरा आहे. मार्डी ग्रास उत्सवासाठी सुट्टी मिळावी याकरिता अमेरिकेत सन 1875 रोजी गव्हर्नर वॉरमोथ याने मार्डी ग्रास ॲक्टवर स्वाक्षरी केली. मार्डी उत्सव म्हणजे कला आणि संस्कृतीच्या एकतेचं प्रतिक मानलं जातं.
या उत्सावाला धार्मिक बाजू देखील आहे. ख्रिस्ती धर्मीय लोकांसाठी या उत्सवाचं मोठं महत्त्व आहे. मार्डी ग्रास उत्सव हा ख्रिश्चन लेंट सुरु होण्यापूर्वी एक दिवस आधी केला जातो. इस्टर सुरु होण्याआधी लेंट सुरु होतो. जसं मुस्लीम धर्मीयांचा रोझा असतो अगदी त्याप्रमाणे ख्रिस्त धर्मीयांचा लेंट असतो. या काळात ख्रिस्ती बांधव उपवास करत असतात. येशू ख्रिस्ताचा ज्या पद्धतीने छळ करण्यात आलेला त्याच्या आठवणी खातर हा दिवस साजरा करतात. या 40 दिवसात अंत:करण शुद्ध व्हावं आणि देवाच्या जवळ जाता यावं हा त्यामागचा उद्देश आहे. मार्डी ग्रास उत्सव हा 40 दिवसांचे उपवास सुरु होण्याचा आधी होतो. या उत्सवात ख्रिस्ती बांधव पाहिजे जे खातात पितात आणि आपल्या प्रियजनांबरोबर आनंद व्यक्त करतात. सध्या सोशल मीडियामुळे या उत्सवाचं महत्व आणि आकर्षण वाढताना दिसत आहे. अमेरिकव्यरिक्त देखील फ्रान्स आणि इतर ख्रिस्ती देशात हा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो.
मार्डी ग्रास उत्सवात कला आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यात येतो. या उत्सावाला मोठी परेड काढली जाते. ख्रिस्ती धर्मीय रंगीबेरंगी कपडे घालून या उत्सवाचा आनंद लुटतात. यावेळी देशाची प्राचीन कला आणि संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं. या उत्सवात ल्युईशियामधील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते.