
कंबोडीया-थायलंडमध्ये सुरू आहे सीमा संघर्ष
आसियानने आजच्या बैठकीत वीट केली चिंता
मलेशियामध्ये पार पडली विशेष बैठक
गेल्या काही महिन्यांपासून कंबोडीया-थायलंडमध्ये सीमा संघर्ष सुरू आहे. या वादाबाबत दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या संघटनेने (ASEAN) चिंता व्यक्त केली आहे. आज मलेशियाची (World News) राजधानी क्वालालंपूर येथे ‘आसियान’ची महत्वाची बैठक पार पडली. कंबोडीया आणि थायलंड देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांमधील शत्रुता त्वरित संपवण्याचे आवाहन आसियानने केले आहे.
हा वाद थायलंड आणि कंबोडियासाठी ऐतिहासिक वाद आहे. प्रेम विहार मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषित करण्यात आले होते. परंतु थायलंड या मंदिराचा काही भाग त्यांच्या भूभागात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवाद आणि धार्मिक वाद वाढत चालला आहे. २००८ मध्ये जागतिक वारसा यादीत यामंदिराचे नाव सामील झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्ष झाला होता.
ट्रम्प यांचा पुन्हा ‘मीच हिरो’चा डंका; Thailand-Cambodia मध्ये युद्धबंदीचा दावा; पण गोळीबार सुरुच
क्वालालंपूर येथे ‘आसियान’ची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रदेशमध्ये शांतता, सुरक्षा स्थिरता, समृद्धी, विकास या विषयावर असियानच्या सदस्यांनी जोर दिला. असियानमध्ये सहभागी असणाऱ्या देशांनी थायलंड-कंबोडीया संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली.
Thailand-Cambodia मध्ये युद्धबंदीचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडियातील प्राणघातक संघर्ष थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी दोन्ही देश पुन्हा युद्धबंदीसाठी सहमत झाल्या म्हटले आहे. मात्र अद्यापही सीमेवर जोरदार गोळीबार सुरुच आहे. कंबोडियाने थाई सैनिक ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही त्यांच्या सैन्यावर हल्ला करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
‘मी एका कॉलवर युद्ध थांबवेन…’ ; Thailand Cambodia संघर्षावर ट्रम्पचा मोठा दावा
मात्र त्यांच्या या दाव्यानंतरही दोन्ही देशात सीमेवर तणावाचा परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी दोन्ही देशांत हल्ले सुरुच आहे. थाई सैनिकांनी लढाऊ विमानांनी हल्ला केला आहे. तसेच बॉम्बफेकही सुरु असल्याची माहिती कंबोडियाच्या मंत्रालयाने दिली आहे. तर यावर थायलंडच्या लष्कराने कंबोडिया नागरी ठिकाणांना लक्ष्य करत असल्याचे म्हटले आहे. कंबोडियाने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप थायलंडने केला आहे.