'मी एका कॉलवर युद्ध थांबवेन...' ; Thailand Cambodia संघर्षावर ट्रम्पचा मोठा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Thailand Cambodia संघर्षामुळे दशलक्ष लोक घरे सोडून पळाली ; सीमेवर दोन दिवसांपासून गोळीबार सुरुच
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा आठ युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, मी १० महिन्यात ८ युद्ध थांबवली आहेत. इस्रायल-हमास, इजिप्त-इथिओपिया, आर्मेनिया-अझरबैजान, कोसोवो-सर्बिया, पाकिस्तान आणि भारत, इस्रायल-इराण यांचा समावेश आहे. तसेच थायलंड आणि कंबोडियातही मी युद्ध थांबवले होते. हे सांगताना मला दु:ख होत आहे, त्यांनी पुन्हा युद्ध सुरु केले आहे. पण उद्या मी त्यांना कॉल करणार आहे, आणि मला विश्वास आहे माझ्या एका कॉलवर दोन शक्तिशाली देशांतील युद्ध थांबेल. आम्ही ताकदीने शांतता निर्माण करु.
सध्या थायलंड आणि कंबोडियात तीव्र संघर्ष सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या गोळीबार पाच जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या अनेक रहिवाशांनी भीतीने स्थलांतर केले आहे. तसेच आश्रस्थांनामध्ये राहणाऱ्या लोकांनाही तिथून स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी दोन्ही देशांत मलेशिया आणि ट्रम्प यांच्या मध्यस्थीने द्विपक्षीय शांतता करार करण्यात आला होता मात्र दोन्ही देशांनी युद्धबंदीचे उल्लंघन करत पुन्हा गोळीबार सुरु केला आहे. शिवाय दोन्ही देश एकमेकांवर प्रथम हल्ला केल्याचा आरोप करत आहेत.
थायलंड आणि कंबोडियातील वाद हा अतिशय जुना आहे. प्रेम विहार मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषित करण्यात आले होते. मात्र थायलंडने या मंदिराचा भाग त्यांच्या भूभागात असल्याचा दावा केला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवाद आणि धार्मिक वाद वाढत चालला आहे. २००८ मध्ये जागतिक वारसा यादीत यामंदिराचे नाव सामील झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्षा झाला होता. आता हा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.
ट्रम्प पुन्हा फेल? Thailand Cambodia सीमेवर बारुदी खेळ!
Ans: थायलंड कंबोडिया संघर्षावरुन ट्रम्प त्यांच्या एका कॉलवर युद्ध थांबेल असा दावा त्यांनी केला आहे.
Ans: थायलंड आणि कंबोडिया युद्धात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू, १० जखमी झाले आहेत.
Ans: थायलंड आणि कंबोडिात प्रेम विहार मंदिरावरुन १९६२ पासून वाद सुरु आहे.






