
At least 12 dead after working Bridge collapse in china
पण या घटनेमुळे चीनच्या बांधकाम गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका मोठ्या नदीवर रेव्ले पुलाचे बांधकाम सुरु होते. यावेळी ही दुर्घटना घडली. शिन्हुआ सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी १६ कामगार पुलावर काम करत होते. यावेळी एक केबल अचानक तुटली आणि सर्व कामगार यलो रिव्हरमध्ये पडले. वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये पूलाचा एक भाग नदीत कोसळलेला दिसत आहे. हा पूल पूर्णपणे तुटला नसून हवेत लटकत आहे. यावरून अपघात किती भयंकर होता हे लक्षात येते.
आजची रात्र खास ठरणार! अवकाशात पाहायला मिळणार ‘Black Moon’ चा दुर्मीळ नजारा
मीडिया रिपोर्टनुसार, येलो रिव्हरमधून १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सध्या बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. त्यांचाही नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेलिकॉप्टर आणि पाण्याखालील रोबोटच्या मदतीने लोकांचा शोध सुरु आहे. अधिकाऱ्यांनी बचाव कार्य रात्रीपासून सुरु ठेवले आहे पण नदीच्या तीव्र प्रवाहामुळे बचाव कार्यात अडचणी येते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनचा येलो रिव्हरवरचा हा रेल्वे पूर १.६ किलोमीटर लांबीचा आहे. हा पूर नदीच्या पृष्ठभागापासून ५५ मीटर (१८० फूट) उंचीवर आहे. चीनच्या एका महत्वाच्या रेल्वे प्रकल्पाचा हा एक भाग आहे. हा पूल पश्चिन चीनच्या दुर्गम भागांना देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी तयार केला जात होता. पण या घटनेमुळे चीनच्या या प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे.
सध्या अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. अधिकाऱ्यांनी याची सविस्तर चौकशी सुरु केली असून प्राथमिक तापासात केबल तुलटल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे, तसेच कामगारांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक सरकारने या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच पीडीतांच्या कुटुंबीयांना प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. कुटुबांना मदतही जाहीर केली आहे.
‘तर खरेदी करु नका…’ ; रशियन तेल खरेदीवरुन भारताचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना थेट सल्ला