Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Iran's New Supreme Leader : इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्यात आली आहे. माजी सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेईचीच निवड झाली असून यामुळे अमेरिका-इस्रायलला झटका बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 09:05 AM
Ayatollah Khamenei's Son, Mojtaba Khamenei elected as Iran’s Supreme Leader

Ayatollah Khamenei's Son, Mojtaba Khamenei elected as Iran’s Supreme Leader

Follow Us
Follow Us:
  • मोजतबा खामेनेई यांची इराणचे नवे सुप्रीम लीडर म्हणून नियुक्ती
  • इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या दबावाखाली घेण्यात आला निर्णय?
  • अमेरिका-इस्रायलला झटका
Mojtaba Khamenei become Iran’s New Supreme Leader : तेहरान : गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणमध्ये संघर्षाचे वातावरण होते. या संघर्षात इराणचे माजी सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला होता. यामुळे इराणला मोेठा झटका बसला होता. दरम्यान आता इराणच्या राजकीय घडामोडींमध्ये आता नवा अध्याय सुरु झाला आहे. अयातुल्ला खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र मोजतबा खामेनेई याची इराणचे नवे सुप्रीम लीडर म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिका-इस्रायललासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

Iran Leadership : खामेनेईंचा अंत! मृत्यूनंतर मुलगा बनला नवा ‘सुप्रीम लीडर’? देशाची कमान घेतली हाती

इराण (Iran) इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार,सर्वोच्च नेत्याची निवड 80 सदस्यसीय तज्ज्ञांच्या समितचीने केली आहे.  परंतु यामुळे वंशपरंपरावाद निर्माण झाला आहे.

कोण आहे मोजतबा खामेनेई?

मोजतबा खामेनेई (वय 56) यांचे दुसरे मोठे सुपूत्र आहेत. त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले असून त्यांना हुज्जतुल-इस्लाम ही उपाधी देण्यात आली आहे. तसेच त्यांना बैत-ए-रहबरी या सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयीन कामकाजात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या अनेक वर्षांपासून मोजतबा यांनी पडद्यामागून इराणची सुत्रे संभाळली आहेत.

त्यांनी सरकारचे अनेक महत्त्वाचे कुटनीतिक निर्णय घेतले आहे. मोजतबा यांनी इराण-इराक युद्धात सैन्यात सेवा बजावली होती. त्यांचे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्ससोबत अत्यंत जवळचे संबंध मानले जातात. तसेच खामेनेई यांचा देखील त्यांचा मुलगा मोजताबावर विश्वास होता. यामुळे मोजतबा खामेनेई यांनी देशाची सुत्रे तात्पुरती हाती घेतली आहे. परंतु त्यांच्या इराणच्या सुप्रीम लीडर बनण्याची शक्यता अधिक आहे.

IRGC च्या दबावाखाली नियुक्ती?

सध्या मोजतबा खामेनेई यांच्या सर्वोच्च नेता म्हणून नियुक्तीने जगभरात खळबळ उडाली आहे. तसेच हा निर्णय इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) दबावाखाली घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. IRGC ने मोजतबा यांची सर्वोच्च नेता म्हणून निवडीसाठी धर्मगुरूंवर दबाव  टाकल्याचा आरोप आहे. 2013 मध्ये या IRGC ला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. अली खामेनेई यांच्या काळाता या संघटनेने राजकारण, लष्कर आणि अर्थव्यवस्थेत मोठा प्रभाव वाढवला आहे.

अमेरिका-इस्रायलला झटका

दरम्यान मोजतबा यांच्या सुप्रीम लीडर म्हणून नियुक्तीने जगभरात खळबळ उडाली आहे. तसेच हा इस्रायल अमेरिकेला मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इराणमध्ये खामेनेईंची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहे. सध्या प्रश्न पडला आहे की, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या नेतृत्वाखाली देशात स्थिरता निर्माण होते का? मोजतबा आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेणार की अमेरिकेशी हातमिळवणी करुन शांतता प्रस्थापित करणार अशा चर्चा सध्या सुरु आहेत.

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहेत मोजतबा खामेनेई?

    Ans: मोजतबा खामेनेई हे इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे धाकटे सुपूत्र आहेत.

  • Que: मोजतबा खामेनेईंच्या नियुक्तवर काय वाद सुरु आहे? का?

    Ans: मोजतबा खामेनेई यांची नियुक्ती इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या दबावाखाली झाली असल्याचा वाद सुरु आहे. तसेच या वादामुळे वंशपरंपरागत नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

  • Que: नव्या सर्वोच्च नेत्यासमोर कोणती आव्हाने आहेत?

    Ans: देशातील बेरोजगारी, महागाई, वाढते आर्थिक निर्बंध आणि अमेरिका-इस्रायल तणावात देशात स्थिरता निर्माण करण्याचे आव्हान इराणच्या नव्या सुप्रीम लीडर समोर आहे.

Web Title: Ayatollah khameneis son mojtaba khamenei elected as irans supreme leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
2

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
3

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
4

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.