
Mexico Train Accident
टेक्सासच्या गॅल्वेस्टनमध्ये भीषण अपघात; मेक्सिकन नौदलाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले
मेक्सिकोच्या रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये एकूण २५० लोक होते. यामध्ये ९ क्रू मेंबर्स आणि २४१ प्रवासी होते. या अपघातात जवळपास १०० लोक जखमी झाले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे. दुर्दैवाने १३ जणांनी आपला जीव गमावला आहे. या अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचाव व सुरक्षा दलांनी जखमींना ट्रेनमधून बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयता दाखल केले. तसेच घटनास्थळी अडकलेल्या प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आले.
दरम्यान या अपघातावर मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडिया शीनबॉम यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी नौदलाच्या सचिवांना आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त भागाला भेट देण्यास सांगितले आहे. तसेच अपघातात मत पडलेल्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदतचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रपतींनी पीडीतांना आवश्यक वैद्यकीय आणि आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.
सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनचे काही डब्बे रुळावरुन घसरुन दरीत कोसळल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच याच मार्गावर २० डिसेंबर रोजी असाच अपघात झाला होता. रेल्वे रुळ ओलांडून जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकला धडक दिली होती. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु यामुळे रेल्वे लाइच्या सुरक्षितेतवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
BREAKING: At least 13 dead and 98 injured, five of them seriously after an Interoceanic Train derailed in Oaxaca, southern Mexico this afternoon.pic.twitter.com/vdLo2I1vqE — Volcaholic 🌋 (@volcaholic1) December 29, 2025
मेक्सिको सिटीच्या संसदेत उडाला गोंधळ ; महिला खासदारांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या अन्…, VIDEO VIRAL
Ans: दक्षिण मेक्सिन राज्यात ओक्साका येथे भयावह रेल्वे अपघात झाला आहे. रेल्वेचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत.
Ans: मेक्सिकोतील रेल्वे अपघातात १३ जणांचा मृत्यू आणि जवळपास १०० जण जखमी झाले आहेत.