Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस; पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट, अनेकांचा मृत्यू

Sri Lanka Flood Update : सध्या भारताचा सागरी सीमा लगतचा देश श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून मान्सून सुरु आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांमध्ये प्रचंड विध्वंस घडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 27, 2025 | 05:06 PM
srilanka flood news

srilanka flood news

Follow Us
Close
Follow Us:
  • श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस
  • पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती
  • अनेकांचा मृत्यू, काही बेपत्ता
Sri Lanka Flood News in Marathi : सध्या जगभरात अनेक देशांमध्ये नैसर्गिक आपत्तींचा कहर सुरु आहे. व्हिएतनाम, इंडोनेशिया, इथिओपियामध्ये नैसर्गिक आपत्तींचा कहर सुरु आहे. तसेच चीनमध्ये गेल्या महिन्यात पावसाने आणि पूराने कहर माजवला होता. आता भारताचा शेजारी देश श्रीलंकेत (Sri Lanka) गेल्या ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पूर आणि भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली आहे.

Earthquake Alert : सुमात्राला पुन्हा भूकंपाचा तडाखा! 6.6 तीव्रतेने हादरले इंडोनेशिया; पूर-भूस्खलनानंतर नवे संकट

श्रीलंकेच्या डोंगराळ भागात बिकट परिस्थिती

श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने गुरवारी(२७ नोव्हेंबर) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनमुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाल आहे. तर जवळपास हजारो लोक प्रभावित झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, श्रीलंकेच्या डोंगराळ भागांमध्ये परिस्थिती बिकट असून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कुंबक्काना येथे एक प्रवासी बस पूराच्या पाण्यात अडकली आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत २३ प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले आहे. भूस्खलनामुळे १० जण जखमी झाले आहे, तर १४ जण बेपत्ता आहेत. परिस्थिती अत्यंत बिघडत चालली आहे.

अध्यक्ष दिसानायके यांनी बोलावली आपत्कालीन बैठक

श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशायकीय जिल्ह्यांची बैठक बोलावली आहे. देशाच्या आग्नेय भागातील परिस्थिती देखील बिकट झाली आहे. ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याचे जोरदार वादळात रुपांतर हो्याची शक्यता आहे. यामुळे २०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या वर्षी देखील श्रीलंकेत मुसळधार पावसाने कहर माजवला होता. अनेक भागात पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. १,३४,००० हून अधिक लोकांवर याचा प्रभाव पडला होता. अनेक शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

इंडोनेशिया-व्हिएतनामध्ये मान्सूनचा कहर

श्रीलंकेशिवाय इंडोनेशिया आणि व्हिएतनामध्ये देखील मान्सूनचा कहर सुरु आहे. इंडोनेशियात सुमात्रा बेटावर सततच्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. यामुळे अनेक जण जखमी झाले असून १० लोकांचा मृत्यू झाला आहे.  मोठ्या प्रमाणात विध्वंस घडला आहे.

तर दुसरीकडे व्हिएतनाममध्ये देखील निसर्गाचा कहर सुरुच आहे. गेल्या आठवड्यांपासून व्हिएतनामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे ९० लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

 

इंडोनेशियात मान्सूनचा कहर! पूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती, किमान १० जणांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्रीलंकेत किती दिवसांपासून सुरु आहे मान्सून?

    Ans: श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

  • Que: श्रीलंकेत पूर आणि भूस्खलनामुळे किती जीवितहानी झाली आहे?

    Ans: श्रीलंकेत पूर आणि भूस्खलनामुळे २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १४ जण बेपत्ता आहे, तर १० जण जखमी झाले आहेत.

Web Title: At least 31 killed in sri lanka flood and landslide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • Sri Lanka
  • World news

संबंधित बातम्या

माजी पाक PM इम्रान खानचा तुरुंगात मृत्यू? शाहबाज सरकारने दिले स्पष्टीकरण
1

माजी पाक PM इम्रान खानचा तुरुंगात मृत्यू? शाहबाज सरकारने दिले स्पष्टीकरण

अमेरिकन परतू लागले घरी! Thanksgiving मुळे रस्त्यावर लागल्या लांबच लांब गाड्यांच्या रांगा,  काय आहे ही परंपरा?
2

अमेरिकन परतू लागले घरी! Thanksgiving मुळे रस्त्यावर लागल्या लांबच लांब गाड्यांच्या रांगा, काय आहे ही परंपरा?

बांगलादेशात भीषण दुर्घटना! ढाकातील झोपडपट्टीला आग लागल्याने अनेक झोपड्या जळून खाक, हजारो बेघर
3

बांगलादेशात भीषण दुर्घटना! ढाकातील झोपडपट्टीला आग लागल्याने अनेक झोपड्या जळून खाक, हजारो बेघर

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’
4

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.