Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muhammad Yunus यांचा पर्दाफाश! बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी उघड केला अंतरिम सत्तेचा काळा कारभार

Muhammad Yunus : बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. राष्ट्रपतींना कैद करण्यापासून ते संविधानाचे नियम पादळी तुडवल्यापर्यंचे खुलासे समोर आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 10:40 AM
Muhammad Yunus यांचा पर्दाफाश! बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी उघड केला अंतरिम सत्तेचा काळा कारभार
Follow Us
Follow Us:
  • मोहम्मद युनूस यांचा काळा चिठ्ठा जगासमोर उघड
  • राष्ट्रपती शहाबुद्दीनने केले खळबळजनक दावे
  • संविधानाचे नियम पायदळी तुडवण्यापासून ते राष्ट्रपतींना कैद करण्यापर्यंतचे आरोप
Muhammad Yunus news marathi : ढाका : बांगलादेशात सध्या तारिक रहमान यांचे नवे सरकार स्थापन झाले असून लोकशाही कार्याला सुरुवात झाली आहे. याच वेळी माजी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी अंतरिम सरकाराचा संपूर्ण जगासमोर पर्दाफाश केला आहे. युनूस यांच्यावर संविधान पायदळी तुडवण्यापासून ते राष्ट्रपतींना कैद करण्यापर्यंतचे गंभीर आरोप आहे.

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना (Sheikh Hasina) सराकराच्या पतनानंतर युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापन झाला होती. दीड वर्षानंतर पुन्हा लोकशाही सरकारची स्थापना झाली आहे. मात्र अंतरिम सरकारच्या भ्रष्ट्राचारामुळे देश मागे पडला आहे. नुकतेच बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळाचा कच्चा चिठ्ठा जगासमोर मांडला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

राष्ट्रपतींच्या अधिकारावर गदा

एका बांगलादेशी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी, ऑगस्ट 2024 ते फेब्रुवारी 2026 चा काळा त्यांच्यासाठी अत्यंत कठीण काळ होता असे सांगितले. त्यांनी सांगितले की, हसीनांनी देश सोडल्यानंतर युनूस सरकारने राष्ट्रपतींना पदावरुन हटवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे अधिकार केवळ राष्ट्रपती भवनापूरते मर्यादित ठेवण्यात आले. तसेच कतार, कोवासचे दौरेही रद्द केले गेले. याशिवाय त्यांना प्रेस रिलीज करण्याची परवानगी देखील नव्हती, असे शहाबुद्दीन यांनी म्हटले.

राष्ट्रपती शहाबुद्दीन यांच्या आरोपांनुसार, युनूस यांनी संविधानीतल तरतुदींचे उल्लंघन करुन अध्यादेश जारी केले.  त्यांनी गेल्या वर्षात एकदाही राष्ट्रपतींची भेट घेतली नाही, त्यांना कोणत्याही कराराची माहिती दिली नाही. तसेच मुख्य न्यायाधीशांच्या मदतीने असंवैधानिक मार्गाने त्यांना पदावरुन हटवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असल्याचा खळबळजनक दावा शहाबुद्दीन यांनी केला. युनूस यांनी त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव टाकला तसेच त्यांच्या विरोधात आंदोलनेही घडवून आणली.

बीएनपीचे कौतुक

दरम्यान त्यांनी बीएनपीच्या नेतृत्वाचे कौतुक करत सांगितले की, या कठीण काळात बीएनपीचे तारिक रहमान (Tarique Rahman) त्यांच्या पाठिशी उभे राहिले. संविधान आणि लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी रहमान यांनी मदत केली असल्याचे शहबुद्दीन यांनी म्हटले. सध्या राष्ट्रपतींच्या युनूस यांच्यावरील आरोपांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे बांगलादेश राजकारणात मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे.

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

Web Title: Bangladesh news marathi president shahabuddin on muhammad yunus interim government tarique rahaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.