इंडोनेशियात मान्सूनचा कहर! पूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती, किमान १० जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या पूर आणि भूस्खलनामुळे किमान १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून अनेकजण बेपत्ता आहेत. बचाव कार्य सुरु असून सततच्या पावसामुळे त्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमात्रा बेटावर सातत्याने मुसळधार पाऊस पडत आङे. यामुळे उत्तरी भागात मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून धरण फुटले आहे.
यामुळे बेटावरील अनेक भागात अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. हा पर्वतीय भाग असल्याने परिस्थीती अधिक बिकट झाली आहे. अनेक गावांमध्ये घरे, रस्ते पाण्याखाली गेली आहेत. तसेच जोरदार प्रवाहामुळे अनेक झाडे उखडून पडली आहेत. यामुळे परिस्थितीतमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
याशिवाय सुमात्रा बेटावरील सिल्बोगा आणि तापुनली प्रांताला सर्वात मोठा झटका बसला आहे. आतापर्यंत पूर आणि भूस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीनजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. भूस्खलनामुळे अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तपानुलीमध्ये देखील एका कुटुंबातील सर्व सदस्य मृत्यूमुखी पडले आहे. पुराच्या पाण्यात घरे, इमारती बुडाल्या आहेत.
सध्या सिल्बोगामध्ये बचाव कार्य सुरु आहे. परंतु पूर आणि भूस्खलनामुळे यामध्ये अडथला निर्माण होच आहे. यामुळे लोकांपर्यंत मदत पोहोचवणे कठीण झाले आहे. मडेलिंग नताल भागात ४७० घरे पाण्याखाली गेली आहेच. याशिवाय नियास बेटावर देखील मातीच्या ढिगाऱ्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. सध्या जास्त धोका असलेल्या भागातील लोकांना घरे रिकमे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इंडोनेशियात ज्वालामुखीचा विस्फोट
काही दिवसांपूर्वी इंडोनेशियात ज्वालामुखीचा विस्फोट झाला होचा. जावा बेटावरील माउंट सेमेरु ज्वालामुखी हिंसकरित्या उद्रेक झाली होती. ज्वालामुखीतून विनाशकारी पायरोक्लास्टिक प्रवाह उत्सर्जित झाला होता. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता.
इंडोनेशियात भीषण दुर्घटना! इस्लामिक शाळेची इमारत कोसळली अन् निरागस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले






