
At least 40 killed after Bridge collapses at Congo copper mine
Congo Mine Collapse News in Marathi : किंशासा : दक्षिण पूर्व काँगोमध्ये एक भीषण दुर्घटना (Accident) घडली आहे. काँगोच्या कलांडो तांबे-कोबाल्ट खाणीत एक पूल कोसळला असून डझनभर लोक खाली अडकले आहे. तर ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (१५ नोव्हेंबर) ही घटना घडली होती. सध्या या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Saudi Bus Accident : सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात; उमराहवरुन परतताना ४२ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू
काय आहे दुर्घटनेचे कारण?
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे पूल कमकुवत झाला होता. पण तरीही बेकायदेशीरपणे खाण कामगांराचे काम सुर होते. त्यांनी सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आणि पूलावर चढले. जवळपास डझनभर लोक पूलावर होते. यामुळे पूल कोसळला आणि भयावह दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे आधीच कामगांराना भूस्खलनाचा इशारा देण्यात आला होता. पण तरीही कामगांरांनी आपला जीव धोक्यात घातला.
Terrifying landslide in an artisanal mine claims the lives of 80 people in Kawama, Democratic Republic of the Congo. pic.twitter.com/7f9Pyo7ncz — Polymarket Intel (@PolymarketIntel) November 16, 2025
सध्या या घटनेचा भयावह व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पूल कोसळ्यावर हवेत धूळ उडाल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूल आधीच कमकुवत झाला होता. अशा परिस्थिती अनेक कामगार त्यावर चढले ज्यांच्या वजनामुळे पूल कोसळला. यावेळी अनेक लोक एकमेकांवर पडले. अनेकजण पूलाखाली पडले. यामध्ये ४० जणांचा मृत्यूची नोंद झाली, तर अनेक जखमी झाले आहेत.
दक्षिण काँगोमध्ये यापूर्वी देखील अनेक खाण अपघात घडला आहे. २०१९ मध्ये कॉंगोच्या लुआलाबा प्रांतात ग्लेनकोरच्या खाणीत भिंत कोसळली होती. यामध्ये ४३ कामगारांचा मृत्यू झाला होता. तर यानंतर २०२२ मध्ये देखील कसाई प्रदेशात त्शिकापा येथील हिरा खाणीत बोगदा कोसळ्याने ४० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते.
तर लुआलाबा कोल्टन खाणीत २०२५ मार्च मध्ये देखील छत कोसळ्याने २० लोकांनी प्राण गमावले होते. यानंतर शनिवारीची घटना. या सर्व घटनांमुळे खाण कामगांरामध्ये भीती पसरली आहे. यावरुन कमकुवत स्थानिक सुरक्षा व्यवस्था आणि खाणीत सुरक्षा मानकांचा अभावा ही मुख्य कारणे आहेत.
Ans: दक्षिण पूर्व काॅंगोतील कलांडो तांबे-कोबाल्ट खाणीत एक पूल अचानक कोसळला आहे. यामुळे पूलावर असलेले खाण कामगार पूलाखाली दबले गेले आहेत. तसेच अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.
Ans: दक्षिण पूर्व काॅंगोमध्ये तांब्याच्या खाणीतील पुल मुसळधार पावसामुळे कमकुवत झाला होता. यामुळे सरकारने भूस्खलनाचा इशारा दिला होता. पण कामगांरानी याकडे दुर्लक्ष केले आणि पूलावर चढले. ज्यामुळे आधीच कमकुवत असलेल्या पूल कोसळला.
Ans: दक्षिण पूर्व काॅंगोतील कलांडो तांबे-कोबाल्ट खाणीत डझनभर कामगार पूलाखाली दबले आहेत, तर यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला आहे.