Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. रविवारी (१६ नोव्हेंबर) हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी रल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. तसेच रॉकेट्सने ट्रेन उडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यापासून जाफर एक्सप्रेस थोडक्यात बचावली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. २०२५ मध्ये जाफर एक्सप्रेसवरील हात आठवा हल्ला आहे, यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
Jaffar Express : पाकिस्तानात जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला ; बॉम्बस्फोटामुळे रेल्वे रुळावरुन घसरली
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जाफर एक्सप्रेस बलुचिस्तानच्या नसीराबाद जिल्ह्यातून जात होता. यावेळी रेल्वे ट्रॅकवर अचानक मोठा स्फोट झाला. परंतु यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, हल्लेखोरांनी शहीद अब्दुल अजीज बुलो परिसरात रेल्वे ट्रॅकवर बॉम्ब बसवला होता, परंतु रेल्वे तिथून जाण्यापवूर्वीच हा स्फोट झाला. यामुळे जाफर एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या प्राण थोडक्यात बचावले.
या घटनेची माहिती मिळताच मोठा गोंधळ उडाला होता. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या घटनेची सखोल चौकशी करुन बॉम्बस्फोटामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेनला रॉकेटने उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचेही म्हटले जात आहे.
कोणी घेतली हल्ल्याची जबाबदारी?
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुच रिपब्लिकन गार्ड्स (BRG)ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. बलुच राष्ट्रवादी नेते मीर याक बलोच यांनी असे निवेदन माध्यमांना दिले होते.
जाफर एक्सप्रेसला सतत लक्ष्य केले जात आहे. हा आठवा हल्ला असून यापूर्वी ७ ऑक्टोबर क्वेटा ते पेशावरदरम्यान हे हल्ले घडवण्यात आले होते. त्यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी सिबी रेल्वे स्थानकाजवळ हल्ला झाला होता, तर त्या आधी ४ ऑगस्ट रोडी कोलपूरजवळ हल्ला झाला होता. या हल्ल्यांची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) घेतली होती. १८ जून २०२५ रोजी देखील जेकबाबादजवळ रिमोट कंट्रोलने स्फोट घडवून आणला होता.
२९ ऑक्टोबर रोजी देखील नसीराबाद जिल्ह्यातील नोटल भागात जाफर एक्सप्रेसला उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शिवाय मार्च २०२५ मध्येही BLA ने जाफर एक्सप्रेस हायजॅक (Jaffar Hijack) केली होती. या हायजॅकमध्ये ४०० प्रवशांना बंधक बनवले होते. बलुच लिबरेशन आर्मीच्या बंदखोरांनी बोलान क्षेत्रातील पीरु, कुनरी आणि गुलदार भागात पटरीवर स्फोटक ठेवून ट्रेन हायजॅक केली होती.जाफर एक्सप्रेस पेशावर ते क्वेटा दरम्यान धावते.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, जाफर एक्सप्रेस बलुचिस्तानच्या नसीराबाद जिल्ह्यात शहीद अब्दुल अजीज बुलो परिसरात हल्ला करण्यात आला.
Ans: जाफर एक्सप्रेसवरील नुकत्याच घडलेल्या हल्ल्यात कोणताही जीवितहानी झालेली नाही.
Ans: तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुच रिपब्लिकन गार्ड्स (BRG)ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
Ans: जाफर एक्सप्रेसवर २०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत ५ हून अधिक वेळा हल्ले झाले आहेत.






