
Attack in Khyber Pakhtunkhwa
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये TTP दहशतवाद्यांचा कहर; पेशावर येथील हल्ल्याची घेतली जबाबदारी
मिळलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथील हांगू जिल्ल्हात काझी तलब पोलिस चौकीवर हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी जवळील टेकडीवर अचानक चौकीवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी आणि दो नागरिक ठार झाले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच सुरक्षा कर्मचारीच सुरक्षित नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सध्या या हल्ल्यानंतर खैबर पख्तुनख्वाच्या अधिकाऱ्यांनी हांगू जिव्ह्यात सुरक्षा दलांची तैनाती वाढवली आहे. या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने घेतलेली नाही. सध्या याचा तपास सुरु आहे. या हल्ल्याता तीव्र निषेध केला जात आहे.
गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देत आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये या दहशतवादी गटांमध्ये देखील अंतर्गत संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानमध्ये आता दहशतवादी हल्ले सामान्य झाले आहे. या हल्ल्यांमध्ये सुरक्षा कर्मचारी, पोलिस निरिक्षक आणि नागरिकांन अधिकतर लक्ष्य केले जात आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये वाढत्या दहशतवादावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पेशावर येथे आत्मघातकी बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानच्या पेशावर येथील फ्रंटियर फेडरल कॉन्स्टेब्युलरी (FC) मुख्यालयावर मोठा हल्ला झाला. या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांना स्वत:ला सुसाइड बॉम्बर बनवले होते. या हल्ल्यात तीन सुरक्षा कर्मचारी ठार झाले होते. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने स्वीकारली होती.
Breaking: पाकिस्तानात सेनेजवळ बॉम्बचा धमाका, आत्मघातकी हल्ल्याने हादरले पेशावर; हल्लेखोर घुसले
Ans: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथील हांगू जिल्ल्हात काझी तलब पोलिस चौकीवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी चौकीवर अंदाधुंद गोळीबार केला आहे.
Ans: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पोलिस चौकीवर झालेल्या गोळीबारात तीन सुरक्षा कर्मतचारी आणि दोन नागरिक ठार झाले आहेत.