Nepal Gen Z protesters attack on EX PM Deuba
Nepal Protest : काठमांडू : नेपाळमध्ये सध्या अराजकता पसरलेली आहे. हिंसक निदर्शने थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. निदर्शकांनी संसदन भवनाला आग लावली आहे. तसेच पंतप्रधान केपी ओली शर्मा, राष्ट्रपती, गृहमंत्री, अर्थमंत्री अशा अनेक वरिष्ठ अधिकार्यांवर हल्ले केले आहे. त्यांच्या घरांवर तोडफोड केली आहे. घरे पेटवून देण्यात आली आहेत. याच वेळी माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
व्हिडिओमध्ये माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा आणि त्यांच्या पत्नी परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा जखमी झाल्याचे दिसत आहेत. तसेच नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पोडोल यांना देखील त्यांच्या घराजवळ पाठलाग करुन मारहाण करण्यात आली आहे. या सर्व घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या घरावरील हल्ल्याचा व्हिडिओ
The Condition of four time PM of Nepal @SherBDeuba and his wife curent foreign minister Arju Deuba Rana pic.twitter.com/BxrQUm9QBs
— IN- Depth Story (@in_depthstory) September 9, 2025
नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पोडोल यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ
Nepal’s Finance Minister is seen running on the street while people are chasing him. pic.twitter.com/xMY8cobUm2
— Vikrant (@Vikspeaks1) September 9, 2025
पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतरही बिकट परिस्थिती
नेपाळमधील आंदोलनाने रौद्र रुप घेतले आहे. पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या राजीनाम्यानंतरही परिस्थितीत बिघडलेली आहे. आंदोलकर्ते थांबण्याचे नाव घेत नाहीत. या हिंसाचारात आंदोलकर्त्यांमधील २१ तरुणांचा मृत्यूही झाला आहे. ३०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहे. परिस्थिती अजूनही अराजक आहे.
बालेन शाह यांचे आंदोलनकर्त्यांना शांत होण्याचे आवाहान
याच वेळी या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाणारे काठमांडूते महापौर बालेंद्र शाह यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी लोकांना शांत राहण्याचे आणि आंदोलन थांबण्याचे आवाहन केले आहेत. सध्या अंतरिम सरकाच्या स्थापनेची मागणी केली जात असून त्याचे नेतृत्त्व बालेन शाहला देण्याची मागणी होत आहे.
FAQs( संबंधित प्रश्न)
नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन?
नेपाळमध्ये सरकारच्या भष्ट्राचारांविरोधात, नेपोटिझ, देशातील बेरोजगारी आणि सोशल मीडियावरील बंदी या सर्व वादांमुळे आंदोलन सुरु होते.
नेपाळच्या पंतप्रधानांनी का दिला राजीनामा?
नेपाळच्या पंतप्रधानांनी देशातील बिघडत चाललेली परिस्थिती पाहून लष्कराकडे मदत मागितली होती. यावेळी त्यांना पद सोडण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर परिस्थितीत नियंत्रणात येईल असे सांगण्यात आले. यामुळे ओली शर्मा यांनी राजीनामा दिला असे म्हटले जात आहे.