
Australian Prime Minister Albanese under fire after Bondi Beach attacks
Anthony Albanese Bondi Beach protest 2025 : ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध बोंडी बीचवर (Bondi Beach attack) सध्या केवळ शोक नाही, तर लोकांच्या डोळ्यांत सरकारबद्दल प्रचंड राग दिसत आहे. १४ डिसेंबर २०२५ रोजी ज्यूंच्या हनुक्का सणादरम्यान झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. या हल्ल्यातील १५ मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जेव्हा पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आपल्या पत्नीसह बोंडी बीचवर पोहोचले, तेव्हा त्यांना अशा प्रतिक्रियेचा सामना करावा लागला ज्याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. जनतेने त्यांना चक्क “देशद्रोही” (Traitor) म्हणून संबोधले आणि सुरक्षेतील अपयशाचा जाब विचारला.
पंतप्रधान अल्बानीज ‘राष्ट्रीय प्रतिबिंब दिनाच्या’ कार्यक्रमासाठी स्मारकाजवळ पोहोचताच तिथे उपस्थित हजारो लोकांनी “शेम, शेम” च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. शांतता राखण्याचे आवाहन करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही जमावाचा संताप शांत करता आला नाही. एका निदर्शकाने पंतप्रधानांच्या तोंडावर ओरडून सांगितले की, “अल्बो, तू एक कमकुवत आणि धोकादायक माणूस आहेस.” परिस्थिती इतकी बिघडली की, भाषण करणे किंवा श्रद्धांजली वाहणे अशक्य झाले आणि सुरक्षा पथकाला पंतप्रधानांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढावे लागले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट
लोकांचा सर्वात मोठा राग हा आहे की, हा हल्ला रोखता आला असता. गुप्तचर अहवालांनुसार, हा हल्ला करणारे पिता-पुत्र आधीच सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होते. तरीही सणासुदीच्या काळात अशा गर्दीच्या ठिकाणी इतका मोठा हल्ला कसा झाला? ज्यू समुदायाच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, सरकार देशातील वाढत्या कट्टरतावादाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. या दबावामुळे आता पंतप्रधानांनी नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (ASIO) च्या कामाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत, मात्र यामुळे जनतेचे समाधान झालेले नाही.
Albanese has been blamed for the #BondiBeachTerrorAttack . That’s why he laid flowers alone,barring the public from the photo opportunity. If he didn’t feel a sense of responsibility he would have walked amongst mourners. Bondi pic.twitter.com/EHWiqXgOsD — PROFESSOR RODGERS SPEAKS FOR THE HARD WORKING AUST (@HelpRodger) December 16, 2025
credit : social media and Twitter
अल्बानीज सरकारवर सध्या ‘पक्षापाती’ असल्याचा गंभीर आरोप होत आहे. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली होती, ज्यामुळे देशातील ज्यू समुदाय प्रचंड नाराज झाला. विरोधकांचे म्हणणे आहे की, सरकारच्या अशा “दुहेरी भूमिकेमुळे” देशातील अतिरेकी घटकांना प्रोत्साहन मिळाले आहे. हेच प्रोत्साहन बोंडी बीचसारख्या भयानक हल्ल्याचे कारण ठरले आहे, अशी भावना सध्या सिडनीमध्ये प्रबळ आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Terrorist Attacks : नवीन वर्षाच्या जल्लोषावर ISISचे सावट; जागतिक स्तरावर हल्ल्यांचा मोठा कट, ‘AI’ चा वापर करून दहशतवादी देणार चकवा
वाढता जनक्षोभ पाहून पंतप्रधानांनी आता डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी द्वेषपूर्ण भाषण (Hate Speech) आणि कट्टरतावादाविरुद्ध नवीन आणि अत्यंत कठोर कायदे करण्याचे आश्वासन दिले आहे. या कायद्यानुसार, द्वेष पसरवणाऱ्या विदेशी नागरिकांचे व्हिसा त्वरित रद्द केले जातील. परंतु, टीकाकारांच्या मते, १५ निष्पाप लोकांच्या मृत्यूनंतर आलेले हे शहाणपण “खूप उशिरा” आले आहे. सध्या संपूर्ण ऑस्ट्रेलियात उच्च सुरक्षा सतर्कता (High Alert) जारी करण्यात आली असून जनतेचा रोष कमी होण्याचे नाव घेत नाहीये.
Ans: १५ लोकांचा बळी घेणारा दहशतवादी हल्ला रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याने आणि सुरक्षेतील त्रुटींमुळे संतापलेल्या जनतेने त्यांचा निषेध केला.
Ans: ज्यू समुदायाचा पवित्र 'हनुक्का' (Hanukkah) सण साजरा केला जात असताना हा भीषण हल्ला झाला.
Ans: त्यांनी पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (ASIO) च्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्याचे आदेश दिले असून एप्रिल २०२६ पर्यंत त्याचा अहवाल मागवला आहे.