नवीन वर्षाचे सेलिब्रेशन उधळण्यासाठी आयसिस दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ISIS New Year attack plot 2025 : संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच एक अत्यंत भीतीदायक बातमी समोर आली आहे. क्रूरतेचा कळस गाठलेली दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. अमेरिकन मासिक ‘न्यूजवीक’ने (Newsweek) प्रसिद्ध केलेल्या एका खळबळजनक अहवालानुसार, आयसिसचे दहशतवादी नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये रक्ताचा खेळ खेळण्याच्या तयारीत आहेत. सौदी अरेबिया, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स यांसारख्या देशांतून मिळालेल्या काही संशयास्पद ‘सांकेतिक संदेशांनी’ (Coded Messages) जागतिक सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे.
अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूनंतर ही संघटना कमकुवत झाल्याचे वाटत होते, परंतु २०२५ मध्ये आयसिसने पुन्हा एकदा स्वतःला संघटित केले आहे. सद्यस्थितीत या संघटनेकडे १०,००० हून अधिक कट्टर लढवय्ये असून ते जगभरात पसरलेले आहेत. एकट्या सीरियामध्ये २,५००, आफ्रिकेत १,२०० आणि शेजारील पाकिस्तानात ३०० दहशतवादी सक्रिय आहेत. अलिकडेच ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या भीषण हल्ल्याने, ज्यामध्ये १६ निष्पापांचा बळी गेला, आयसिस अजूनही किती घातक आहे हे जगाला दाखवून दिले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट
यावेळचा धोका अधिक गंभीर असण्याचे कारण म्हणजे आयसिसने आपली कार्यपद्धती बदलली आहे. आता हे दहशतवादी केवळ बंदुका आणि बॉम्बवर अवलंबून नाहीत. आयसिसच्या ‘अल-नबा’ मासिकातून असे उघड झाले आहे की, संघटनेने आता ‘एआय’ (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. दहशतवाद्यांना आता फक्त विचारसरणीचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर ते स्वतः एआयच्या मदतीने हल्ल्याची ठिकाणे, वेळ आणि मार्ग शोधतात. यामुळे गुप्तचर यंत्रणांना त्यांचा माग काढणे अत्यंत कठीण झाले आहे.
USA just busted a planned New Years event IED based terror attack. It’s not far !!! Their actions will have consequences pic.twitter.com/8cWkTBGGfE — Aadi Achint 🇮🇳 (@AadiAchint) December 15, 2025
credit : social media and Twitter
२०२५ मधील आयसिसच्या हालचाली पाहता, त्यांचे मुख्य लक्ष्य ख्रिश्चन आणि ज्यू समुदाय असल्याचे दिसून येते. मध्य पूर्व आणि युरोपमधील चर्च, प्रार्थना स्थळे आणि गर्दीचे उत्सव हे त्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट्स’ आहेत. नुकतेच जर्मनी आणि पोलंडमधील ख्रिसमस मार्केटमध्ये होणारे मोठे हल्ले पोलिसांनी उधळून लावले, अन्यथा तिथे रक्ताचे पाट वाहू शकले असते. ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर ज्यू समुदायावर झालेला हल्ला ही याच मोठ्या कटाची एक छोटी झलक असल्याचे मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Crisis: ‘भारतासोबतच्या संबंधांवरच अवलंबून आहे आपली समृद्धी’ Sheikh Hasina यांनी Yunus ला हिंसेवर सुनावले खडे बोल
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जगभरात पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत आयसिसचे हे ‘लोन वुल्फ’ (एकाकी हल्लेखोर) कधी आणि कुठे हल्ला करतील, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. अनेक देशांनी आधीच सुरक्षा व्यवस्था कडक केली असून संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. नवीन वर्ष साजरे करताना नागरिकांनीही सतर्क राहणे आता काळाची गरज बनली आहे.
Ans: आयसिस प्रामुख्याने युरोप आणि मध्य पूर्वेतील चर्च, ख्रिसमस मार्केट आणि ज्यू प्रार्थना स्थळांना लक्ष्य करत असल्याचे गुप्तचर अहवालात म्हटले आहे.
Ans: दहशतवादी आता हल्ल्यांचे नियोजन, ठिकाणांचा शोध आणि सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) मदत घेत आहेत.
Ans: ताज्या आकडेवारीनुसार, इस्लामिक स्टेटकडे सध्या सुमारे १०,००० सक्रिय लढवय्ये आहेत, जे सीरिया, आफ्रिका आणि पाकिस्तानात पसरलेले आहेत.






