Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानमध्ये अंतर्गत कुरखोडीने वाढणार ताण; बलुच आर्मीने सुरु केले ऑपरेशन ‘BAAM’

Baloch Army Operation 'BAAM' : पाकिस्तानमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तान सैन्यामध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. या संघर्षाने तीव्र रुप धारण केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2025 | 04:25 PM
Baloch Army action against Pakistan Army, Operation 'BAAM' launched

Baloch Army action against Pakistan Army, Operation 'BAAM' launched

Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तान सैन्यामध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. या संघर्षाने तीव्र रुप धारण केले असून गेल्या काही दिवसांपासून बलुच आर्मी पाकिस्तान सैन्यावर सतत हल्ले करत आहे. यासाठी बलुच आर्मीने मोहिम सुरु केली आहे. या अंतर्गत बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी लष्कराविरोधात एकामागून एक कारवाई करत आहे.

पाकिस्तानी सैन्याविरोधात कारवाईला वेग

बलुच लिबरेशन आर्मीच्या या कारवायांनी तीव्र वेग धारण केला आहे. गेल्या तीन दिवसांत बलुच आर्मीने पाकिस्तान सैन्यावर तीव्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यात ५० पाकिस्तानी सैनिक, आयएसआय एजंट्स आणि गुप्तचर संस्थांचे ९ एजंट ठार करण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानमध्ये राजकारण तापले; माजी पंतप्रधान इम्रान खानच्या मुलांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय?

७२ तासांत ८४ हल्ले

मिळालेल्या माहितीनुसार, बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात आतापर्यंत ५१ सैनिक जखमी झाले आहेत. तसेच पाकिस्तानी सैन्याचे ५ ड्रोन बलुच सैन्याने नष्ट केले आहेत. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याविरोधाच्या या कारवाईला Operation BAAM असे नाव दिले आहे. ९ जुलै रोजी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून ११ जूलैपर्यंत ७२ तासांत बलुच सैन्यानी ८४ ठिकाणी हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.

एक दिवसापूर्वी ११ जुलै रोजी बलुच आर्मीने पाकिस्तानच्या ८ लष्करी छावण्यांवर हल्ला केला होता. यामध्ये १८ सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मीने सर्व हल्ल्यांची जबाबादारी घेतली आहे. तसेच ही केवळ सुरुवात असल्याचेही म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तान आणि चीनमधील आर्थिक प्रकल्पांवर देखील बलुचांनी हल्ले केले आहेत.

पाकिस्तान सरकारचे मौन

बलुच लिबरेशन आर्मीचे पाकिस्तानी लष्करावरील हल्ले दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहेत. या वाढत्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराला मोठा धक्का बसला आहे. तर पाकिस्तानी सरकारने यावर अधिकृत पातळीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.यामुळे देशात अस्थिरता वाढत आहे. बलुच लिबरेशन आर्मीची कारवाई केवळ लष्करी कारवायांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी ही सामजिक आणि राजकीय चळवळीत बदलत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Breaking: बलुचिस्तानमध्ये ९ बस प्रवाशांचे अपहरण; ओळख विचारून गोळ्या घालून हत्या

Web Title: Baloch army action against pakistan army operation baam launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार
1

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार

Sicily Discovery: इटलीमध्ये सिसिलीच्या किनाऱ्यावर श्वास रोखणारा शोध; 2,000 वर्षांपूर्वीच्या जहाजाचे अवशेष अन् वाइन कंटेनर्स सापडले
2

Sicily Discovery: इटलीमध्ये सिसिलीच्या किनाऱ्यावर श्वास रोखणारा शोध; 2,000 वर्षांपूर्वीच्या जहाजाचे अवशेष अन् वाइन कंटेनर्स सापडले

Indonesia Earthquake : इंडोनेशिया 7.7 तीव्रतेच्या भूकंपाने हादरले; समुद्राखाली 10 किमी खोलीवर केंद्रबिंदू, त्सुनामीचा अलर्ट जारी
3

Indonesia Earthquake : इंडोनेशिया 7.7 तीव्रतेच्या भूकंपाने हादरले; समुद्राखाली 10 किमी खोलीवर केंद्रबिंदू, त्सुनामीचा अलर्ट जारी

IndiaAt80: भारत बनतोय जागतिक महासत्ता; स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिका आणि इस्रायलकडून पंतप्रधान मोदींना हार्दिक शुभेच्छा
4

IndiaAt80: भारत बनतोय जागतिक महासत्ता; स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिका आणि इस्रायलकडून पंतप्रधान मोदींना हार्दिक शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.