Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Balochistan Protest: बलोचिस्तानमध्ये लोकशाहीची गळचेपी; कलम 144 लागू, पाकिस्तान सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न

Balochistan Protest : खुजदार जिल्ह्यातील जवाह आणि जहरे भागात निदर्शकांनी दुसऱ्या दिवशी क्वेटा-कराची महामार्ग रोखल्याने तणाव वाढला. जाणून घ्या काय आहे सद्यस्थिती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 31, 2025 | 12:22 PM
Balochistan on fire Section 144 imposed protesters block Quetta-Karachi highway

Balochistan on fire Section 144 imposed protesters block Quetta-Karachi highway

Follow Us
Close
Follow Us:

Section 144 Quetta : बलुचिस्तानात परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. पाकिस्तान सरकारने संपूर्ण प्रांतात कठोर निर्बंध लादत १५ दिवसांसाठी कलम १४४ लागू केले आहे. या आदेशानंतर दोन व्यक्ती दुचाकीवर बसू शकणार नाहीत, पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकणार नाहीत, शस्त्रांचे प्रदर्शन किंवा वापर करता येणार नाही. यासोबतच काळ्या काचा असलेली वाहने, नोंदणी नसलेल्या मोटारसायकली, मिरवणुका, सभा, रॅली यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर चेहरा झाकणे, मग ते मास्कने असो किंवा मफलरने, अशा कोणत्याही स्वरूपातील ओळख लपवणे बेकायदेशीर ठरवले आहे.

सरकारकडून घेतलेला हा निर्णय प्रांतात आधीच असलेल्या असंतोषाच्या ज्वालेला अधिकच इंधन टाकणारा ठरला आहे. खुजदार जिल्ह्यातील जवाह आणि जहरी भागात गेल्या दोन दिवसांपासून आंदोलकांनी क्वेटा-कराची महामार्ग रोखून धरला आहे. या महामार्गाच्या बंदोबस्तामुळे वाहतूक ठप्प झाली असून प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निदर्शनांमागचे कारण

या निदर्शनांचा उगम एका धक्कादायक घटनेतून झाला. स्थानिक नेत्यांच्या आरोपानुसार, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी हब चौकी येथे प्रवासी व्हॅन थांबवली. त्यामध्ये असलेल्या महिला व लहान मुलांना बाहेर काढल्यानंतर, पुरुष प्रवाशांना व वाहनालाच अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. या प्रकाराला “जबरदस्तीचे अपहरण” म्हणून स्थानिक लोक पाहत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी महामार्ग रोखून निदर्शने सुरू केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SCO Tianjin Summit 2025 : SCO शिखर परिषदेत पाहुण्यांचे स्वागत करण्यापासून ते बसवण्यापर्यंत ‘रोबोट’च करणार पाहुणचार

NDPचा सरकारवर हल्लाबोल

नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी (एनडीपी) चे केंद्रीय प्रवक्ते शाहजेब बलोच यांनी क्वेटा प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदेत या निर्बंधांचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, “हे आदेश केवळ असंवैधानिक नाहीत तर लोकशाही अधिकारांचा गळा दाबण्याचा उघड प्रयत्न आहेत.” शाहजेब बलोच यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, बलोचिस्तानात आणि देशभरातील वंचित समाजातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. अनेकांना जबरदस्तीने बेपत्ता केले जात आहे. जर खरोखरच कुणी गुन्हेगार असेल, तर त्याला न्यायालयात उभे केले पाहिजे; पण संपूर्ण समाजाला शिक्षा देणे हे सरळ सरळ जातीय शुद्धीकरण असून वसाहतवादी मानसिकतेचे दर्शन घडवते.

स्थानिक नेत्यांचा संताप

खुजदारमधील स्थानिक नेते बाबा फतेह जहरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रशासनाने शांततापूर्ण आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केला. “सुरक्षा दलांनी महिलांशी गैरवर्तन केले, तरुणांना मारहाण केली. हे अत्याचार असह्य आहेत. आम्ही लोकांना मोठ्या संख्येने निदर्शनात सामील होण्यासाठी आवाहन करत आहोत,” असे ते म्हणाले. स्थानिक नागरिकांचा प्रश्न असा आहे की, जर सरकारकडे काही शंका असेल तर कायद्याच्या चौकटीत कारवाई करावी. पण नागरिकांवर अन्याय करून, महिलांवर बळाचा वापर करून आणि बेपत्ता करण्याच्या घटनांमुळे प्रशासनावरील विश्वास पूर्णपणे ढासळत चालला आहे.

बलुचिस्तानातील वाढता असंतोष

बलुचिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून असंतोष वाढत चालला आहे. स्थानिक लोक स्वतःला उपेक्षित मानतात. शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा यांचा अभाव, तसेच सततचा सुरक्षा दलांचा दबाव या सगळ्यामुळे असंतोषाला सतत खतपाणी मिळत आहे. कलम १४४ सारखे कठोर निर्बंध या असंतोषावर उपाय नसून, उलट या ज्वालेला अधिक भडकवणारे ठरत आहेत. सरकारला वाटते की निर्बंधांमुळे शांतता प्रस्थापित होईल; परंतु लोकांचा विश्वास आहे की शांततेसाठी न्याय आवश्यक आहे. जोपर्यंत जबरदस्तीच्या बेपत्ता घटना थांबत नाहीत, आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष शमणे कठीण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saffron Shawl : मोदी इफेक्ट! आता असीम मुनीरला कोणी ओढवली भगवी शाल? पाकिस्तानच्या फील्ड मार्शलचा VIDEO VIRAL

सरकारचे कठोर निर्बंध

बलुचिस्तान आज एक उकळता ज्वालामुखी बनला आहे. सरकारचे कठोर निर्बंध आणि प्रशासनाचे दडपशाही धोरण यामुळे प्रांतातील लोक अधिकच संतप्त झाले आहेत. “शांतता हवी असल्यास न्याय द्या” असा संदेश आज या प्रांतातून जोरदारपणे उमटतो आहे. आगामी काळात पाकिस्तान सरकारने कोणता मार्ग अवलंबतो दडपशाहीचा की संवादाचा यावर बलुचिस्तानचा भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: Balochistan on fire section 144 imposed protesters block quetta karachi highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • International Political news
  • Karachi
  • pakistan

संबंधित बातम्या

World News: पाकिस्तानचे वाजले बारा! ‘या’ महत्वाच्या प्रांतात IED चा ब्लास्ट; एसएचओ अन् 6 पोलिस जखमी
1

World News: पाकिस्तानचे वाजले बारा! ‘या’ महत्वाच्या प्रांतात IED चा ब्लास्ट; एसएचओ अन् 6 पोलिस जखमी

War Alert: पुन्हा सुरु होणार भारत-पाक युद्ध? पाकड्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आकाशमार्गे ड्रोनसोबत पाठवला ‘मृत्यू संदेश’; पहा VIDEO
2

War Alert: पुन्हा सुरु होणार भारत-पाक युद्ध? पाकड्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आकाशमार्गे ड्रोनसोबत पाठवला ‘मृत्यू संदेश’; पहा VIDEO

Pakistan Hindu Murder: बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या; नेमकं कारण काय?
3

Pakistan Hindu Murder: बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या; नेमकं कारण काय?

Pakistan Coup: पाकिस्तानात ‘पाळीव साप’ मालकालाच चावणार? लष्कर-ए-तैयबाचे असीम मुनीर यांना उघड आव्हान; सत्तापालटाची चिन्हे
4

Pakistan Coup: पाकिस्तानात ‘पाळीव साप’ मालकालाच चावणार? लष्कर-ए-तैयबाचे असीम मुनीर यांना उघड आव्हान; सत्तापालटाची चिन्हे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.