आता असीम मुनीरला कोणी ओढवली भगवी शाल? पाकिस्तानच्या फील्ड मार्शलचा VIDEO VIRAL ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Asim Munir saffron shawl video : पाकिस्तानमधील पंजाब प्रांत सध्या भीषण पुराच्या संकटात सापडला आहे. हजारो गावे पाण्याखाली गेली आहेत, शेकडो लोक बेघर झाले आहेत आणि करतारपूरसह अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळे जलमय झाली आहेत. या कठीण परिस्थितीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शुक्रवारी (२९ ऑगस्ट २०२५) पूरग्रस्त भागांचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी दरबार साहिब करतारपूर गुरुद्वाराला भेट दिली. परंतु त्यांच्या या भेटीपेक्षा सोशल मीडियावर वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे दरबार साहिबातील शीख भाविकांनी त्यांना भगवा शाल व पगडी परिधान करून सन्मानित केले. लष्करप्रमुखावर भगवा शाल दिसल्याने या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काही तासांतच व्हायरल झाले आहेत.
लष्करप्रमुख मुनीर हे करतारपूर गुरुद्वारामध्ये पोहोचले तेव्हा स्थानिक शीख समुदायाने पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या खांद्यावर भगवी शाल चढवण्यात आली तसेच डोक्यावर भगवी पगडीही बांधण्यात आली. पाकिस्तानसारख्या मुस्लिमबहुल देशातील लष्करप्रमुखाला अशा वेषात पाहून अनेकांचे लक्ष वेधले गेले.
या दृश्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर काहींनी याकडे सांस्कृतिक आदराचे प्रतीक म्हणून पाहिले, तर काहींनी यावर राजकीय उपरोध केले. परंतु निःसंशयपणे, करतारपूर भेटीदरम्यान असीम मुनीर यांची ही प्रतिमा पाकिस्तानपुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL: ट्रम्प मरणार? ‘सिम्पसन’चे भाकित आणि राष्ट्राध्यक्ष बेपत्ता, सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ, व्हाईट हाऊस चिंतेत
पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, असीम मुनीर यांनी सियालकोट सेक्टर, शकरगढ, नारोवाल आणि करतारपूर परिसरासह पंजाब प्रांतातील अनेक पुरग्रस्त भागांची पाहणी केली. स्थानिक प्रशासन आणि लष्कराकडून सुरू असलेल्या मदत व बचाव कार्याचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. लष्करप्रमुखांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. विशेषतः करतारपूर परिसरातील शीख समाजाच्या चिंता त्यांनी ऐकून घेतल्या. त्यांनी आश्वासन दिले की, “भीषण पुरामुळे बाधित दरबार साहिब करतारपूरसह सर्व धार्मिक स्थळांचे मूळ स्वरूप लवकरच पुनर्संचयित केले जाईल. पाकिस्तानातील धार्मिक स्थळांचे रक्षण हे लष्कराचेही कर्तव्य आहे.”
COAS Syed Asim Munir visited the flood affected Sikh community in Sialkot, assuring full restoration of religious sites, including Durbar Sahib Kartarpur. A true gesture of care and support. 🇵🇰🤝#Flood #FloodAlert #PakistanCricket #triseries2025 #POLISIPEMBUNUH #PAKvAFG pic.twitter.com/Um4nGTplGl
— Zaheer Abbas (@zabbas2334) August 30, 2025
credit : social media
गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत पंजाब जलमय झाला आहे. किमान १,७०० गावे पाण्याखाली गेली असून शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांतच २२ जणांचा जीव गेला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या ४.५ किलोमीटर अंतरावर असलेले करतारपूर गुरुद्वारा साहिब जवळजवळ पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये उघडण्यात आलेला हा कॉरिडॉर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या धार्मिक स्थळाचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तान सरकार व लष्करावर मोठा दबाव आहे.
असीम मुनीर यांना भगवा शाल घालण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांचे कौतुक केले की, त्यांनी सांप्रदायिक ऐक्याचे उदाहरण ठेवले. तर काहींनी टोमणा मारला की, पाकिस्तानचा लष्करप्रमुख भगवा परिधान करणे ही गोष्ट देशांतर्गत वाद निर्माण करू शकते. तथापि, या सर्व चर्चांपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानमधील पुरग्रस्त नागरिकांचे दुःख. करतारपूर भेटीदरम्यान मुनीर यांनी ज्या संवेदनशीलतेने स्थानिक शीख समाजाशी संवाद साधला, त्याने किमान काहींना तरी दिलासा मिळाला, हे नक्की.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पच्या टॅरिफमुळे बदलली जगाची राजनीती… रशिया, चीन आणि भारतानंतर आता ‘हे’ 3 देश करणार महायुती
पूराच्या विळख्यात अडकलेल्या पंजाब प्रांताला लवकरच मदतीचा हात मिळेल, अशी अपेक्षा आहे. असीम मुनीर यांच्या करतारपूर भेटीने धार्मिक सौहार्दाचे चित्र उमटवले असले, तरी या भेटीचा राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्नही सुरू आहे. एक मात्र खरे मुनीर यांच्या भगव्या शालीतील प्रतिमेने पाकिस्तानपुरतेच नव्हे, तर जागतिक स्तरावरही चर्चा रंगवली आहे.