बांगलादेशात आता हिंदूंनंतर ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य; ख्रिसमसच्या दिवशी कट्टरपंथीयांनी जाळली 17 घरे
ढाका: बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. हिंदूंवर वारंवार होणाऱ्या अत्याचारा दरम्यान आता ख्रिश्चन समुदायालाही लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल ख्रिसमसच्या दिवशी बंदरबन जिल्ह्यातील लामा परिसरात कट्टरपंथीयांनी 17 ख्रिश्चन कुटुंबांची घरे जाळून टाकल असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला 25 डिसेंबर रोजी सकाळी करण्यात आला. ही घटना ख्रिश्चन समुदायावर आतापर्यंत झालेल्या सर्वांत मोठ्या हल्ल्यांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.
धमक्यांनंतरही पोलिसांचा निष्काळजीपणा
मीडिया रिपोर्टनुसार, टोंगजिरी परिसरातील न्यू बेटाचरा पारा गावातील ख्रिश्चन समुदाय चर्च नसल्यामुळे शेजारील गावात ख्रिसमस साजरा करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान अज्ञात उपद्रवींनी गावात हल्ला करत 17 घरे जाळली. या आगीत अंदाजे 15 लाख टक्यांहून अधिक नुकसान झाले असल्याचे सागंतिले जात आहे. विशेष म्हणजे, याआधी 17 नोव्हेंबर रोजी या गावातील लोकांना गाव रिकामे करण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.
गंगा मणि त्रिपुरा या व्यक्तीने लामा पोलिस ठाण्यात 15 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती, पण पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.या हल्ल्यामुळे पीडित कुटुंबे बेघर झाली आहेत. गंगा मणि त्रिपुराने आपल्या व्यथेबद्दल सांगताना म्हटले, “आमची घरे पूर्णतः जळून खाक झाली आहेत. आता आमच्याकडे काहीही शिल्लक नाही.” मात्र, ख्रिश्चनांवरील या हल्ल्यांचे कार अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पीढ्यान्पीढ्या गावात राहत असलेल्या लोकांवर हल्ला
त्रिपुरा समुदायातील लोकांनी दावा केला आहे की, ते अनेक पिढ्यांपासून या गावात राहत आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून त्यांना या जागेतून हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, सरकारने या जमिनीचा लिज एका पोलीस अधिकाऱ्याला, माजी आयजीपी बेनजीर अहमद यांना दिला आहे. पूर्वी येथे ‘एसपी गार्डन’ होता. या घटनेने बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आहे. सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरही या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बांगलादेश पाकिस्तानसोबत करणार लष्करी सराव
दुसरीकडे बांगलादेशने आपल्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तान आर्मीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील पराभवानंतर 53 वर्षांनी पुन्हा पाकिस्तानी सेना बांगलादेशच्या भूमीवर पाय ठेवणार आहे, परंतु वेगळ्या भूमिकेत. एका मेजर जनरलच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी विशेष टीम बांगलादेशी आर्मीला प्रशिक्षण देणार आहे. यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. याशिवाय अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.