
Bangladesh political violence
Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड
बांगलादेशाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजीजूर रहमान मुसाब्बीर याची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी (०६ डिसेंबर २०२६) रोजी ही घटना घडली आहे. अजीजूर रहमान मुसाब्बीर हे ढाका मेट्रोपॉलिन नॉर्थ व्हॉलंटियर पार्टीचे सरचिटणीस होते. मंगळवारी ८.३० च्या सुमारास बसुंधरा येथील कारवान बाजार परिसरात त्यांच्या हल्ला करण्यात आला होता.
हल्लेखोरांनी मुसाब्बीरवर अनेक गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला. या हल्ल्यात आणखी एक नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. नागरिकाला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मुसब्बीर देखील गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुका या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. परंतु त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहे. राजकीय सूडातून लोकांची हत्या केली जात आहे. यापूर्वी इंन्कलाब मंचचे प्रवक्ते उस्मान हादी यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या अवामी लीग आणि त्याच्या छात्र लीग पक्षाने राजकीय सूडातून घडवून आणली असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे.
शिवाय हिंदूचया हत्यांचेही प्रमाण बांगलादेशात प्रचंड वाढले आहे. आतापर्यंत २० दिवसात तब्बल ५ जणांच्या गोळ्या झाडून, मारहाण करुन, जिवंत जाळून हत्या करण्यात आली आहे. या सर्व घडामोडी पाहता बांगलादेशाच्या सुरक्षा व कायदा व्यवस्थेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच येत्या आगामी निवडणुका निष्पक्ष होणार का नाही याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडमोडींवर बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखालील अंतरिम सरकारने मौन धरले आहे. यामुळे तज्ज्ञांकडून गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….
Ans: बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) च्या युवा नेता अजीजूर रहमान मुसाब्बीर याची हत्या करण्यात आली आहे.
Ans: अजीजूर रहमान मुसाब्बीर यांची हत्या मंगळवारी ०६ जानेवारी २०२६ रोजी ८.३० च्या सुमारास बसुंधरा येथील कारवान बाजार परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Ans: बांगलादेशातील हिंसाचाराचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र निषेध केला जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानावाधिकार संघटनांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.