Bangladesh experts reject Pakistan’s apology on 1971 genocide
Bangladesh rejects Pakistan apology : १९७१ चा रक्तरंजित इतिहास आजही बांगलादेशाच्या सामूहिक स्मरणात खोलवर कोरलेला आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारांच्या जखमा अजूनही न भरलेल्या आहेत. लाखो निरपराधांचा जीव घेणाऱ्या आणि हजारो महिलांची अब्रु लुटणाऱ्या त्या भयानक घटनांचा उल्लेख होताच, बांगलादेशातील प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावतात. मात्र अलीकडेच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा तथाकथित ‘बंधुत्वा’ची भाषा सुरू झाली आहे. “भाऊभाव” दाखवून नातं जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला, बांगलादेशी तज्ज्ञ सय्यद बदरुल अहसान यांनी दिलेला सडेतोड धडा आता चर्चेत आहे.
प्रसिद्ध पत्रकार, इतिहासकार व राजकीय विश्लेषक सय्यद बदरुल अहसान यांनी अवामी लीगच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या लेखात पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना थेट उद्देशून लिहिले आहे :
“शाहबाज शरीफ, त्यांचे मंत्री आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी बांगलादेशात त्यांच्या देशवासीयांनी पसरवलेल्या दहशतीची आठवण करून देणारे दस्तऐवज पुन्हा वाचले पाहिजेत. पाकिस्तानला बांगलादेशाचा भाऊ म्हणणे म्हणजे शहीदांच्या रक्ताचा अपमान होईल.”
त्यांनी स्पष्ट लिहिले की, १९७१ च्या युद्धकाळात पाकिस्तानी जनरल ए.ए.के. नियाझी यांनी स्वतःच सैनिकांना “बांगलादेशी महिलांवर बलात्कार करून एक नवीन वंश निर्माण करा” असे अमानुष आदेश दिले होते. हा इतिहास पाकिस्तान विसरू इच्छितो, पण बांगलादेश कधीच विसरणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US 50Percent Tariff : अमेरिकेचा भारतावर कर प्रहार; 50% टॅरिफमुळे ‘या’ क्षेत्रांना होणार आता गंभीर नुकसान
२६ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने :
३० लाखांहून अधिक लोकांची हत्या केली,
२ ते ४ लाख महिलांवर बलात्कार केला,
१ कोटी लोकांना भारतात निर्वासित जीवन जगण्यास भाग पाडले,
असंख्य गावे आणि शहरे पेटवून दिली.
ही आकडेवारीच त्या काळातील अमानुषतेचा पुरावा आहे. म्हणूनच, आज अर्धशतक उलटूनही बांगलादेशी नागरिक पाकिस्तानकडून खरी माफी मागितली जावी, अशी मागणी करतात.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अलीकडेच दावा केला की, १९७१ च्या नरसंहाराचा प्रश्न आधीच दोनदा सोडवला गेला आहे. एकदा १९७४ मध्ये आणि दुसऱ्यांदा २००० च्या दशकात.
मात्र अहसान यांनी यावर तीव्र टीका केली. ते म्हणाले :
१९७४ मध्ये झुल्फिकार अली भुट्टो ढाक्यात आले, पण त्यांनी फक्त ‘तौबा’ म्हटले. हे माफी नव्हते.
२००० च्या दशकात परवेझ मुशर्रफ आले, पण त्यांनी केवळ ‘दुःख व्यक्त’ केले. हेही माफी नव्हती.
खरी माफी म्हणजे जबाबदारी स्वीकारून स्पष्टपणे गुन्ह्यांची कबुली देणे आणि पीडितांच्या स्मृतीचा आदर करणे. पाकिस्तानने ते कधी केलेले नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indians in Global Politics: जागतिक शक्तीचा ठसा! कोण म्हणतं भारत मर्यादित आहे? 29 देशांमध्ये चमकले ‘हे’ 261 भारतीय चेहरे
अलीकडेच बांगलादेशातील काही राष्ट्रविरोधी गटांना प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती मिळाली आहे. हे गट १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनेच काम करत होते. आता पुन्हा “जुना देश एक करावा” असे बोलून पाकिस्तान त्यांना बळ देत आहे.
पण बांगलादेशी नागरिकांचे उत्तर स्पष्ट आहे :
“आम्ही आपला देश रक्ताने मिळवला आहे. पाकिस्तानचे बंधुत्व आम्हाला मान्य नाही.”
१९७१ च्या नरसंहारातून जगाला एक धडा मिळाला की अन्याय, हिंसा आणि अमानुषता कितीही काळ दडपली तरी तिचा इतिहास उघडकीस येतोच. पाकिस्तानने बांगलादेशाची खरी माफी मागेपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही. आज सय्यद बदरुल अहसान यांनी दिलेला हा सडेतोड संदेश पुन्हा एकदा दाखवतो की, बांगलादेशाचा आत्मसन्मान, शहीदांचा त्याग आणि महिलांच्या यातना कधीच विसरल्या जाणार नाहीत.