Bangladesh Political Crisis Muhammad Yunus vows for Hindu or other minority protection
ढाका: सध्या बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मोहम्मद युनूस यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे, परंतु बांगलादेशात वाढता हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे लोक संतापलेले आहेत. अशातच राजीनाम्याच्या चर्चांदरम्यान युनूस यांना हिंदूंची आठवण आली आहे. त्यांनी हिंदूं आणि इतर अल्पसंख्यांकां संबंधी एक मोठी घोषणा केली आहे.
सोमवारी अमेरिकेच्चया धार्मिक आयोगाचे अध्यक्ष स्टीफन श्नेक यांच्या युनूस यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान युनूस यांनी हिंदूं धर्मीय आणि इतर अल्पसंख्यांकीय लोकांची सुरक्षा करण्याची ग्वाही दिली. युनूस यांनी म्हटले की, “बांगलादेशात सुमारे १७ कोटी लोक राहतात.माझा प्रयत्न सर्व समुदायाच्या लोकांना एकत्र आणणे आणि त्यांचे रक्षण करणे राहिल.कोणत्याही अल्पसंख्यांकांवर अत्याचार होऊ देणार नाही.” युनीस यांच्या या विधानावर राजकीय तज्ज्ञांनकडून संशय व्यक्त केला जात आहे. खरंच युनूस यांना हिंदूं आणि इतर अल्पसंख्यांकीयांच्या सुरक्षेची काळजी आहे, की केवळ खुर्ची वाचवण्याच्या प्रयत्नात रचलेला डाव आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहे.
परंतु या घोषणेंमागे वेगळाच उद्देश असल्याचे म्हटले जात आहे. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये बांगलादेशात हिंदू वर इतर अल्पसंख्यांक समुदायावर सतत हल्ले झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये हजारांहून अधिक हिंदू लोकांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहे. तसेच या सर्व घटनांना थांबवण्यात व त्यावर कारवाई करण्यात युनूस सरकार अपयशी ठरले आहे. या हल्ल्यांमागे कट्टरवादी इस्लामिक गटांचा हात असल्याचे म्हटले जात आहे. जागतिक स्तरावर युनूस सरकारला टीकांचा सामनाही करावा लागला आहे.
याशिवाय, भारताकडूनही बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. युनूस यांच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. याच दरम्यान युनूस यांनी हिंदूंच्या सुरक्षेवर मोठी घोषणा केली आहे. यामुळे खुर्ची वाचवण्यासाठी युनूस यांनी ही खेळी खेळली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विरोधक आणि लष्कराच्या दबावामुळे युनूस यांना सत्तेत राहणे कठीण होत आहे, यामुळे हिंदूंच्या सुरक्षेच्या प्रश्न त्यांनी पुढे केला आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, युनूस यांची ही भूमिका त्यांची प्रतिमा सुधारणेच्या प्रयत्नांची आहे. सत्तेत पाय उतार होण्याच्या भीतीने त्यांनी हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे कले आहे. यानुळे युनूस यांचा दुटप्पी चेहरा समोर आला आहे. ही परिस्थिती राजकीय गरजेतून उभारली गेली असल्याचे स्पष्ट युनूस यांच्या विधानावरुन स्पष्ट होत आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.