
फोटो सौजन्य सोशल मीडिया
या संघर्षात सुमारे १.२० लाख लोकांचा मृत्यू झाला असून लाखो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले . त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय प्रक्रिया नसून शांतता आणि स्वशासनाच्या दिशेने टाकलेले एतेहासिक पाऊल मानले जात आहे .
Bangsamoro प्रदेशात जवळपास २.४० मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत . या निवडणुकीत संसदेच्या ८० जागांसाठी प्रतिनिधी निवडले जाणार आहेत . त्यामध्ये प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी , जिल्हानिहाय प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांसाठी राखीव जागांचा समावेश आहे .
निवडून आलेले संसद सदस्य पुढे प्रदेशाचा Chief Minister निवडणार आहे . त्यामुळे मतदानातून केवळ आमदार किंवा खासदार निवडले जाणार नाहीत , तर संपूर्ण स्वायत्त प्रदेशाच्या पुढील राजकीय दिशेवर परिणाम होणार आहे .
Bangsamoroचा इतिहास संघर्षाने भरलेला आहे. स्वायत्ततेच्या मागणीसाठी अनेक दशकांपासून सरकारविरोधात सशस्त्र आंदोलन सुरू होते. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर नागरिक, सुरक्षा कर्मचारी आणि बंडखोरांचा बळी गेला.
२०१४ मध्ये फिलिपिन्स सरकार आणि Moro Islamic Liberation Front (MILF) यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर स्वायत्त Bangsamoro प्रदेशाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. २०१९ मध्ये BARMMची स्थापना झाली आणि माजी बंडखोर नेत्यांना संक्रमण काळातील प्रशासनात भूमिका मिळाली.
मात्र निवडणुका अनेक वेळा पुढे ढकलण्यात आल्या. अखेर आता पहिल्या नियमित संसदीय निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Strait of Hormuz : आखातात पुन्हा तणाव! जहाजावर हल्ला; एकाचा मृत्यू, तेलपुरवठ्याची चिंता वाढली
या निवडणुकीसमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत . प्रदेशातील काही भागांमध्ये राजकीय आणि स्थानिक संघर्षाचा इतिहास कायम आहे . त्यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर २० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत . याशिवाय MILF च्या हजारो माजी लढवय्यांच्या पूर्ण निःशस्त्रकरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही . काही गटांमध्ये राजकीय मतभेद आणि स्थानिक गटबाजीही आहे .
त्यामुळे सोमवारी होणारे मतदान हे फक्त सरकार निवडण्यापुरते मर्यादित राहणार नाही . पाच दशकांच्या हिंसाचारानंतर लोकशाही व्यवस्था प्रत्यक्षात किती मजबूत होते आणि शांतता किती टिकते , याची ही मोठी परीक्षा असणार आहे . मतपेटीतील हा पहिला कौल Bangsamoro च्या भविष्यासाठी नवा अध्याय ठरतो का , याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे .