Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Midterm Elections 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा; रिपब्लिकन जिंकल्यास प्रत्येक अमेरिकनाला मिळणार 5,000 डॉलर्स

US Midterm Elections 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, जर रिपब्लिकन पक्षाने नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुका जिंकल्या, तर ते प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकाला ५,००० डॉलर्सचा लाभांश देतील.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 10, 2026 | 12:38 PM
Trump 5000 dollar dividend US Midterm Elections 2026

Trump 5000 dollar dividend US Midterm Elections 2026

Follow Us
Follow Us:
  • ‘ट्रम्प डिव्हिडंड’ची घोषणा
  • अब्जावधी डॉलर्सचा खर्च
  • कडक अट व युद्ध समाप्तीचा दावा

अमेरिकेमध्ये आगामी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांचे (US Midterm Elections 2026) वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. राजकीय वातावरण तापलेले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी घोषणा करून संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. २०२६ च्या रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात (RNC Midterm Convention) बोलताना ट्रम्प यांनी जाहीर केले की, जर आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने विजय मिळवून हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हज आणि सिनेट या दोन्ही सभागृहात बहुमताने सत्ता कायम ठेवली, तर अमेरिकेतील प्रत्येक प्रौढ नागरिकाला ५,००० डॉलर्स (अंदाजे ४.२० लाख रुपयांपेक्षा जास्त) दिले जातील.

या विशेष आर्थिक सवलतीला किंवा लाभांशाला ट्रम्प यांनी ‘ट्रम्प डिव्हिडंड’ (Trump Dividend) असे नाव दिले आहे. आपल्या भाषणात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत झाली आहे आणि देश मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा करत आहे. ट्रम्प यांच्या मते, देश भरपूर पैसे कमवत असल्यामुळेच ते सामान्य जनतेला आर्थिक लाभाच्या स्वरूपात हा पैसा परत करू शकत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Eucalyptus : भारत ते लॅटिन अमेरिका… निलगिरीची झाडे बनली जगाची डोकेदुखी; जगात भूजल पातळी आली धडाधड खाली

१.२२ ट्रिलियन डॉलर्सच्या बजेटचे गणित आणि आव्हाने

ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्याने राजकीय वर्तुळात तसेच अर्थतज्ज्ञांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, अमेरिकेत आणि जगभरात मिळून सुमारे २४५ दशलक्ष (२४.५ कोटी) प्रौढ अमेरिकन नागरिक आहेत. जर प्रत्येक प्रौढ नागरिकाला ५,००० डॉलर्स दिले, तर अमेरिकन तिजोरीवर थेट १.२२ ट्रिलियन डॉलर्स (अंदाजे ११६ लाख कोटी रुपये) इतका अवाढव्य आर्थिक भार पडेल.

तथापि, एवढा प्रचंड निधी नक्की कुठून उभा केला जाईल आणि त्याचे वाटप प्रशासकीय स्तरावर कसे केले जाईल, याविषयी ट्रम्प यांनी आपल्या भाषणात कोणतीही स्पष्ट नियमावली जाहीर केलेली नाही. यापूर्वी त्यांनी आयात शुल्कातून (Tariffs) नागरिकांना आर्थिक मदत देण्याचे संकेत दिले होते, परंतु अशा मोठ्या निर्णयासाठी अमेरिकन काँग्रेसची (संसद) मंजुरी मिळणे अनिवार्य असते.

‘पैसा अमेरिकेतच खर्च करा’ ट्रम्प यांची प्रमुख अट

या योजनेची घोषणा करताना ट्रम्प यांनी एक अत्यंत महत्त्वाची अट स्पष्टपणे नमूद केली आहे. मिळालेली ५,००० डॉलर्सची रक्कम नागरिकांनी केवळ आणि केवळ अमेरिकेच्या हद्दीतच खर्च केली पाहिजे. ही रक्कम घेऊन नागरिकांनी कॅनडा, चीन, जर्मनी किंवा इतर कोणत्याही परदेशात खर्च करण्यासाठी जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.

#WATCH | Speaking at the RNC Midterm Convention in Dallas, US President Donald Trump announces he will issue a $5,000 dividend to every adult US citizen if the Republican Party holds the Senate and House in 2026 pic.twitter.com/zXzAepxcsy — ANI (@ANI) September 10, 2026

credit – social media and Twitter

पण, या अटीची अंमलबजावणी कशी होणार? नागरिक हे पैसे परदेशात खर्च करत आहेत की देशांतर्गत बाजारात, यावर सरकार कशी नजर ठेवणार? या प्रश्नांचे उत्तर अद्याप प्रशासनाकडून मिळालेले नाही. याव्यतिरिक्त, ही रक्कम मिळवण्यासाठी वयाची अट सोडून उत्पन्नाची कोणती मर्यादा असेल का, याबाबतही अद्याप अस्पष्टता आहे. देशाबाहेर राहणाऱ्या सुमारे २० लाख अमेरिकन नागरिकांना या योजनेचा फायदा मिळेल की नाही, यावरही प्रश्नचिन्ह कायम आहे.

इराण युद्धावर भाष्य आणि निवडणुकांनंतर युद्ध समाप्तीचा दावा

आपल्या या प्रदीर्घ भाषणात ट्रम्प यांनी केवळ आर्थिक घोषणांवरच भर दिला नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि विशेषतः इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षावरही मोठे विधान केले. अमेरिकेतील आगामी मध्यावधी निवडणुकांनंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पूर्णपणे संपेल, असा दावा ट्रम्प यांनी केला.

इराणवर जोरदार टीका करताना राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, इराण सध्या अमेरिकेतील निवडणुकांच्या निकालांची वाट पाहत आहे. अमेरिकेत राजकीय सत्तापालट व्हावा आणि तिथे एक दुर्बळ नेतृत्व सत्तेवर यावे, जेणेकरून त्यांना सहजरीत्या अण्वस्त्रे विकसित करता येतील, अशी आशा इराण बाळगून आहे. “इराण अमेरिकन निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे,” असा थेट आरोप ट्रम्प यांनी केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Suicide Prevention Day: तुटण्यापेक्षा बोललेले बरे! आत्महत्येचे विचार रोखण्यासाठी ठरतील प्रभावी ‘हे’ 3 सोपे मार्ग

निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प यांचे मास्टरस्ट्रोक की राजकीय जुमला?

अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून महागाई, वाढते इंधन दर आणि लांबलेला इराण संघर्ष यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये काही प्रमाणात असंतोष दिसून येत आहे. जनमताच्या चाचण्यांमध्ये पक्षाची घसरती लोकप्रियता सावरण्यासाठी ट्रम्प यांनी ही ५,००० डॉलर्सची घोषणा करून मोठा राजकीय डाव खेळल्याचे मानले जात आहे. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने नवजात बालकांसाठी ‘ट्रम्प अकाउंट्स’ आणि सैनिकांसाठी ‘वॉरियर डिव्हिडंड’ अशा योजना जाहीर केल्या होत्या. आता हा ‘ट्रम्प डिव्हिडंड’ रिपब्लिकन पक्षाला निवडणुका जिंकून देणार की हा केवळ निवडणुकीचा प्रचार ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.

Web Title: Us midterm elections 2026 trump promises 5000 dollar dividend to americans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • elections
  • World news

संबंधित बातम्या

Eucalyptus : भारत ते लॅटिन अमेरिका… निलगिरीची झाडे बनली जगाची डोकेदुखी; जगात भूजल पातळी आली धडाधड खाली
1

Eucalyptus : भारत ते लॅटिन अमेरिका… निलगिरीची झाडे बनली जगाची डोकेदुखी; जगात भूजल पातळी आली धडाधड खाली

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं
2

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

Sindh Division : पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे विभाजन होणार? लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या योजनेवर भडकले बिलावल भुट्टो-झरदारी
3

Sindh Division : पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे विभाजन होणार? लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या योजनेवर भडकले बिलावल भुट्टो-झरदारी

UK Israel Sanctions: वेस्ट बँक वादात इस्रायल आक्रमक! ब्रिटनविरोधात घेतले 4 मोठे कठोर निर्णय; राजनैतिक वर्तुळात खळबळ
4

UK Israel Sanctions: वेस्ट बँक वादात इस्रायल आक्रमक! ब्रिटनविरोधात घेतले 4 मोठे कठोर निर्णय; राजनैतिक वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.