Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi: पॅरिसमधील पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; पतंप्रधान म्हटले, ‘हे वसुधैव कुटुंबकमचे प्रतीक’,VIDEO

PM Modi : पॅरिसमध्ये बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी याचे वर्णन भारत-फ्रान्स सांस्कृतिक संबंधांचा नवा आधारस्तंभ आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक असे केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 07, 2026 | 11:53 AM
BAPS Temple Paris PM Modi Paris Temple InaugurationSwaminarayan Mandir France

BAPS Temple Paris PM Modi Paris Temple InaugurationSwaminarayan Mandir France

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक उद्घाटन
  • वसुधैव कुटुंबकमचा संदेश
  • ‘मेड इन इंडिया, बिल्ट इन फ्रान्स’

युरोपच्या सांस्कृतिक पटलावर भारताची प्राचीन अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक प्रखरतेने चमकू लागली आहे. फ्रान्सची ऐतिहासिक राजधानी पॅरिस जवळील बुसी-सेंट-जॉर्ज (Bussy-Saint-Georges) येथे भव्य आणि नयनरम्य BAPS स्वामीनारायण हिंदू मंदिराचे प्राणप्रतिष्ठापन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या ऐतिहासिक प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आभासी उपस्थिती लावून संपूर्ण युरोपातील आणि जगभरातील सनातन प्रेमींना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले की, जरी ते भौतिकदृष्ट्या पॅरिसमध्ये उपस्थित नसले, तरी मन आणि हृदयाने ते या पवित्र वातावरणात लीन आहेत. हे मंदिर केवळ पूजेचे किंवा श्रद्धेचे ठिकाण नसून भारत आणि फ्रान्स या दोन महान राष्ट्रांमधील सांस्कृतिक समन्वयाचा, सहकार्याचा आणि जागतिक बंधुत्वाचा एक नवा आधारस्तंभ आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, या भारतीय तत्त्वज्ञानाचा संदेश हे मंदिर संपूर्ण युरोप खंडात पसरवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘मेड इन इंडिया’ आणि ‘बिल्ट इन फ्रान्स’चा अप्रतिम मिलाफ

या मंदिराच्या स्थापत्यशैलीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी एका अनोख्या पैलूवर प्रकाश टाकला. हे मंदिर खऱ्या अर्थाने ‘मेड इन इंडिया’ आणि ‘बिल्ट इन फ्रान्स’ चे एक आदर्श उदाहरण बनले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी लागणारे नक्षीदार राजस्थान आणि भारतातील दगड कुशल कारागिरांनी भारतात अत्यंत कलात्मकतेने कोरले. त्यानंतर ते दगड फ्रान्समध्ये आणून तिथल्या आधुनिक अभियांत्रिकीच्या (Engineering) सहाय्याने अत्यंत अचूकतेने जोडण्यात आले. प्राचीन भारतीय शिल्पकला आणि फ्रेंच आधुनिक तंत्रज्ञानाचा हा मेळ शतकानुशतके दोन्ही देशांमधील मैत्रीची साक्ष देत राहील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Germany: अंतराळ क्षेत्रात युरोपचा नवा अध्याय! जर्मन कंपनीच्या ‘स्पेक्ट्रम’ रॉकेटचे यशस्वी उड्डाण; 5 उपग्रह अवकाशात स्थापित

BAPS स्वामीनारायण संस्थेचे पूजनीय महंत स्वामी महाराज यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या १३ दिवसीय ‘संस्कृती महोत्सवात’ हजारो भाविकांनी हजेरी लावली. प्रमुख स्वामी महाराजांनी भारताचा सांस्कृतिक वारसा जगभरात पोहोचवण्याचा जो संकल्प सोडला होता, त्याचाच हा विस्तार आहे. २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबू धाबी येथे उभारण्यात आलेल्या भव्य स्वामीनारायण मंदिरानंतर आता पॅरिसमधील मंदिराची उभारणी ही जागतिक स्तरावरील भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाची नवीन पायरी मानली जात आहे.

It is a matter of great joy that BAPS Swaminarayan Hindu Mandir is being inaugurated in Paris.@BAPS https://t.co/PaXRoM0mkv — Narendra Modi (@narendramodi) September 6, 2026

credit – social media and Twitter

भारत आणि फ्रान्स यांच्यातील ऐतिहासिक सांस्कृतिक दुवे

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी फ्रान्स आणि भारत यांच्यातील शतकांपासून असलेल्या सलोख्याची आठवण करून दिली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सच्या भूमीवर भारतीय सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास आजही तिथे जिवंत आहे. तसेच, फ्रेंच विद्वान रोमेन रोलँड यांनी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांवर केलेले लेखन असो किंवा ‘श्री माँ’ (The Mother) यांचा पॅरिस ते पुदुचेरी असा झालेला अध्यात्मिक प्रवास असो, या सर्व घटनांनी उभय देशांतील जनतेला सातत्याने एकमेकांच्या जवळ आणले आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, आयफेल टॉवरसमोर आंतरराष्ट्रीय योग दिनाला फ्रेंच नागरिकांकडून मिळणारा उदंड प्रतिसाद आणि फ्रेंच विद्वानांनी संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी दिलेले योगदान हे भारत-फ्रान्स मैत्रीचे जिवंत पुरावे आहेत. चालू वर्ष २०२६ हे दोन्ही देश ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष’ (India-France Year of Innovation) म्हणून साजरे करत आहेत. अशा काळात हे मंदिर तंत्रज्ञान, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासोबतच सांस्कृतिक बंध अधिक दृढ करेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले

सेवा आणि मानवी मूल्यांचे केंद्र

वैदिक मंत्र “समनं मनः सह चित्तमेषम्” चा संदर्भ देत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, लोकांची मने जोडणे हाच भारताचा मूळ विचार आहे. स्वामीनारायण संस्था नेहमीच भक्तीसोबतच मानवतेच्या सेवेसाठी अग्रेसर राहिली आहे. हे मंदिरदेखील येणाऱ्या काळात फ्रान्स आणि संपूर्ण युरोपमध्ये सामाजिक सेवा, आरोग्य, शिक्षण आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदतीचे मुख्य केंद्र बनेल.

पॅरिसमधील हे मंदिर फ्रान्सची सांस्कृतिक विविधता आणखी समृद्ध करेल. पंतप्रधान मोदींनी BAPS संस्था, महंत स्वामी महाराज आणि जगभरातील कोट्यवधी भाविकांचे मनापासून अभिनंदन केले आणि भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आपण स्वतः या मंदिराला भेट देऊन दर्शन घेऊ, असा मानसही व्यक्त केला.

Web Title: Baps swaminarayan temple paris inauguration pm modi india france relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • France
  • PM Narendra Modi
  • temple news
  • World news

संबंधित बातम्या

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
1

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार
2

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार

26 लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् 750 किलो ड्रग्ज; ‘मिशन इम्पॉसिबल’ शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा
3

26 लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् 750 किलो ड्रग्ज; ‘मिशन इम्पॉसिबल’ शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा

Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले
4

Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.