Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ती’ अफवाच निघाली खोटी,ज्यामुळे DeepuDas बनला जमावशाहीचा बळी; Bangladeshमधील मॉब लिंचिंगमध्ये धक्कादायक खुलासा

No Blasphemy Evidence : बांगलादेशातील मयमनसिंग येथे हिंदू तरुण दीपू दास यांच्या जमावाने केलेल्या मारहाणीच्या तपासात ईशनिंदा किंवा धार्मिक भावना दुखावल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही, असे अधिकाऱ्यांनी उघड केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 21, 2025 | 02:24 PM
Big revelation in Bangladesh mob lynching No evidence of blasphemy found against Hindu youth Deepu Das

Big revelation in Bangladesh mob lynching No evidence of blasphemy found against Hindu youth Deepu Das

Follow Us
Close
Follow Us:
  •  मयमनसिंगमधील हिंदू तरुण दीपू दास यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या RAB-14 ने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याविरुद्ध ईशनिंदेचा (Blasphemy) कोणताही पुरावा सापडलेला नाही.
  •  केवळ वैयक्तिक वादातून एका मुस्लिम सहकाऱ्याने खोटा आरोप केला आणि कारखान्याचे रक्षण करण्यासाठी दीपूला जमावाच्या हवाली करण्यात आले, जिथे त्यांची निर्घृण हत्या झाली.
  •  सोशल मीडियावरील व्हिडिओ फुटेजच्या आधारे आतापर्यंत ७ मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी ३ संशयितांची सखोल चौकशी सुरू आहे.

Dipu Chandra Das lynching evidence update : बांगलादेशातील (Bangladesh) अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या मालिकेतील सर्वात क्रूर घटना म्हणजे मयमनसिंग येथील दीपू चंद्र दास (Dipu Chandra Das) यांची झालेली हत्या. या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. सुरुवातीला ईशनिंदेचा (धार्मिक भावना दुखावल्याचा) आरोप करून जमावाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी (RAB) केलेल्या अधिकृत तपासात या हत्येमागील एक अत्यंत भयानक आणि संतापजनक वास्तव समोर आले आहे. दीपू दास यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे.

तपासात काय निष्पन्न झाले?

RAB-14 चे कंपनी कमांडर मोहम्मद समसुझमान यांनी या प्रकरणाचा अधिकृत तपास अहवाल उघड केला आहे. तपास पथकाने दीपू दास यांचे फेसबुक अकाउंट, व्हॉट्सॲप चॅट्स आणि सर्व सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीची कसून तपासणी केली. मात्र, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर धार्मिक अपमान किंवा आक्षेपार्ह मजकूर सापडलेला नाही. विशेष म्हणजे, ज्या जमावाने “अल्लाहु अकबर” च्या घोषणा देत दीपूला जिवंत जाळले, त्यापैकी एकाही व्यक्तीने दीपूला कधीही अनुचित बोलताना प्रत्यक्ष ऐकले नव्हते. हा केवळ अफवेच्या जोरावर केलेला हत्याकांड होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ! 24 तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट; अमेरिकेत तुफान गदारोळ

कारखान्यातील कट आणि विश्वासघात

तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या पूर्वनियोजित कट वाटत आहे. १८ डिसेंबरच्या रात्री दीपू दास ज्या कपड्याच्या कारखान्यात काम करत होते, तिथेच त्यांच्या एका मुस्लिम सहकाऱ्यासोबत त्यांचा वाद झाला होता. हा वैयक्तिक राग काढण्यासाठी त्या सहकाऱ्याने दीपूवर ईशनिंदेचा खोटा आरोप केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कारखाना प्रशासनाने कारखान्याचे नुकसान टाळण्यासाठी दीपूला चक्क कारखान्याच्या आवाराबाहेर काढून दिले. बाहेर दबा धरून बसलेल्या हिंसक जमावाने दीपूला गाठले, त्यांची निर्घृण हत्या केली आणि मानवी क्रूरतेचा कळस गाठत त्यांचा मृतदेह झाडाला लटकवून पेटवून दिला.

Moments before the lynching- video of #DipuChandraDas from the factory. Evidence suggests the dispute was over money owed, not blasphemy.
The blasphemy charge appears to be fabricated after the killing.
A Hindu man lynched, and a false narrative built to justify mob violence.… pic.twitter.com/gr5ZpCTfGR — The Alternate Media (@AlternateMediaX) December 20, 2025

credit : social media and Twitter

अटकेचे सत्र आणि पोलिसांची भूमिका

या हत्येचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून टीका झाली. त्यानंतर बांगलादेशी पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. एएसपी मोहम्मद अब्दुल्ला अल मामून यांनी सांगितले की, सुरुवातीला दोन जणांना अटक करण्यात आली होती, मात्र आता अटकेतील लोकांची संख्या ७ वर पोहोचली आहे. पोलीस आता व्हिडिओ फुटेज वापरून जमावातील इतर लोकांची ओळख पटवत आहेत. या कटाचा मुख्य सूत्रधार कोण होता, याचा शोध घेण्यासाठी आणखी तीन संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: हिंदू तरुणाच्या लिंचिंग प्रकरणी 10 जणांना अटक; भारतीय उच्चायुक्तालयात सुरक्षा व्यवस्था वाढवली

आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप आणि भारताची चिंता

या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी बांगलादेशमधील ‘जमावशाही’वर (Mobocracy) तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ‘कोअॅलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ (CoHNA) ने जागतिक माध्यमांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिंदू संघटनांच्या मते, बांगलादेशात वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी आणि हिंदूंचे अस्तित्व संपवण्यासाठी ‘ईशनिंदा’ हा एक सोयीस्कर शस्त्र म्हणून वापरला जात आहे. भारतातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दीपू दास यांच्यावर कोणता आरोप करण्यात आला होता?

    Ans: दीपू दास यांच्यावर ईशनिंदा (Blasphemy) आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप कारखान्यातील सहकाऱ्याने केला होता.

  • Que: तपास यंत्रणेला ईशनिंदेचा पुरावा मिळाला का?

    Ans: नाही, RAB-14 च्या तपासात असे स्पष्ट झाले आहे की दीपू दास यांच्या सोशल मीडिया किंवा वागण्यात ईशनिंदेचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

  • Que: या प्रकरणी आतापर्यंत किती जणांना अटक करण्यात आली आहे?

    Ans: पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली असून ३ संशयितांची चौकशी सुरू आहे.

Web Title: Big revelation in bangladesh mob lynching no evidence of blasphemy found against hindu youth deepu das

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh Crisis
  • Bangladesh News
  • Bangladesh violence

संबंधित बातम्या

Bangladesh Violence: हिंदू तरुणाच्या लिंचिंग प्रकरणी 10 जणांना अटक; भारतीय उच्चायुक्तालयात सुरक्षा व्यवस्था वाढवली
1

Bangladesh Violence: हिंदू तरुणाच्या लिंचिंग प्रकरणी 10 जणांना अटक; भारतीय उच्चायुक्तालयात सुरक्षा व्यवस्था वाढवली

Tarique Rahman: कट्टरपंथीयांचा काळ बनून परतणार तारिक रहमान; ज्याच्या एका आवाजावर उभा राहतो अख्खा Bangladesh
2

Tarique Rahman: कट्टरपंथीयांचा काळ बनून परतणार तारिक रहमान; ज्याच्या एका आवाजावर उभा राहतो अख्खा Bangladesh

Bangladesh Violence: ज्याच्यामुळे बांगलादेश पेटला, त्याच्यावरच युनूसने उधळली स्तुतीसुमने; हादीच्या अंत्यसंस्काराला जनसागराचा ओघ
3

Bangladesh Violence: ज्याच्यामुळे बांगलादेश पेटला, त्याच्यावरच युनूसने उधळली स्तुतीसुमने; हादीच्या अंत्यसंस्काराला जनसागराचा ओघ

Justice For Deepu Das: बांगलादेशातील हिंसेवर मोठी अपडेट!  7 आरोपी गजाआड; थरकाप उडवणारा खुलासा आला समोर
4

Justice For Deepu Das: बांगलादेशातील हिंसेवर मोठी अपडेट! 7 आरोपी गजाआड; थरकाप उडवणारा खुलासा आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.