
Bilal Arif Salafi Murder Muridke
Lashkar-e-Taiba Commander Killed Pakistan 2026 : पाकिस्तानमधील (Pakistan) पंजाब प्रांतातील मुरीदके हे शहर केवळ एक भौगोलिक ठिकाण नाही, तर ते लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचे शक्तीकेंद्र आहे. याच ठिकाणच्या ‘मरकज-ए-तैबा’ या मुख्यालयातून भारतासह जगभरात दहशतीचे जाळे विणले जाते. मात्र, शनिवारी ईदच्या पवित्र दिवशी याच बालेकिल्ल्यात रक्ताचा सडा पडला. लष्करचा कुख्यात कमांडर बिलाल आरिफ सलाफी याची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेने केवळ दहशतवादी संघटनाच नाही, तर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणाही हादरून गेल्या आहेत.
शनिवारी जगभरात ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जात होता. मुरीदके येथील मरकजमध्येही ईदची नमाज अदा केली जात होती. नमाज संपल्यानंतर सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत असतानाच, गर्दीत मिसळलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी बिलाल आरिफ सलाफीला लक्ष्य केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी प्रथम बिलालवर गोळीबार केला. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतरही हल्लेखोरांचा राग शांत झाला नव्हता; त्यांनी चाकू उपसून त्याच्या शरीरावर अनेक वार केले. ही हत्या केवळ ‘मारणे’ या उद्देशाने नव्हती, तर एक ‘भयानक संदेश’ देण्यासाठी केली गेल्याचे दिसून येते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : आता युद्धाची वेळ! ’24 तासांत देश सोडा’, सौदीने इराणला दाखवला आरसा; राजदूतांना गाशा गुंडाळण्याचे आदेश
बिलाल आरिफ सलाफी हा लष्कर-ए-तोयबासाठी केवळ एक साधा कमांडर नव्हता. तो संघटनेत ‘रिक्रूटमेंट’ (भरती) आणि ‘ट्रेनिंग’ (प्रशिक्षण) विभागात महत्त्वाची भूमिका बजावत होता. तरुणांना दहशतवादाच्या मार्गावर वळवणे आणि त्यांना कट्टरपंथी विचारसरणीचे बाळकडू देणे, हे त्याचे मुख्य काम होते. लष्करच्या अनेक कारवायांच्या नियोजनात त्याचा थेट सहभाग असायचा. अशा वरिष्ठ नेत्याची त्याच्याच घरात हत्या होणे, हा लष्करसाठी गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठा वैयक्तिक आणि धोरणात्मक धक्का मानला जात आहे.
Exclusive: Lashkar-e-Taiba commander Bilal Arif Salafi shot and stabbed to death inside Markaz Taiba, Muridke, moments after Eid prayers. Eyewitness visuals show chaos inside the premises senior trainer Maulana Abu Zarr seen being restrained as panic unfolds. Initial inputs… pic.twitter.com/QRsjXKfhbq — Shivank Mishra (@shivank_8mishra) March 21, 2026
credit – social media and Twitter
मरकज-ए-तैबा हा परिसर पाकिस्तानमधील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानला जातो. इथे लष्करचे स्वतःचे सुरक्षा रक्षक आणि पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांचे (ISI) कडेकोट बंदोबस्त असतात. अशा ठिकाणी हल्लेखोर शस्त्रांसह कसे घुसले? त्यांनी हत्या करून तिथून पळ काढलाच कसा? हे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी नेत्यांमध्येही आता दहशतीचे वातावरण आहे. त्यांना आता स्वतःच्याच बालेकिल्ल्यात असुरक्षित वाटू लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: 24 मार्चला होणार महायुद्ध? 48 तासांचा काऊंटडाऊन सुरु; ट्रम्पची अट न मानल्यास इराणमध्ये पसरणार अंधाराचे साम्राज्य
गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये अनेक भारतविरोधी दहशतवाद्यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. बिलाल सलाफीची हत्याही याच साखळीचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. ही अंतर्गत वादातून झालेली हत्या आहे की एखाद्या व्यावसायिक एजन्सीने (Professional Agency) केलेले ऑपरेशन, याचा तपास पाकिस्तानी यंत्रणा करत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही हल्लेखोराचा सुगावा लागलेला नाही.
बिलाल सलाफीच्या हत्येनंतर पाकिस्तानात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. लष्कर-ए-तोयबा आता प्रतिशोधाची भाषा करत आहे. मात्र, या हत्येमुळे पाकिस्तानचा चेहरा जगासमोर पुन्हा एकदा उघडा पडला आहे की, त्यांच्या भूमीवर आजही दहशतवादी मुख्यालये बिनदिक्कतपणे सुरू आहेत.
Ans: बिलाल आरिफ सलाफी हा लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर होता, जो प्रामुख्याने नवीन दहशतवाद्यांची भरती आणि प्रशिक्षणाचे काम पाहत होता.
Ans: ही हत्या पाकिस्तानच्या मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय असलेल्या 'मरकज-ए-तैबा' येथे ईदच्या दिवशी झाली.
Ans: हल्लेखोरांनी प्रथम त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर चाकूने अनेक वार करून त्याची निर्घृण हत्या केली.