२४ मार्चला होणार महायुद्ध? ट्रम्प यांचा इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम; वीज प्रकल्प उडवण्याची दिली धमकी( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Trump ultimatum to Iran 48 hours : आज २२ मार्च २०२६, जगाच्या इतिहासातील एक अत्यंत संवेदनशील दिवस ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला (Iran) दिलेला ‘अल्टिमेटम’ केवळ दोन देशांमधील वाद नसून, तो तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकतो. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून जगाची ‘ऊर्जा नस’ दाबली आहे, ज्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणचे अस्तित्व धोक्यात आणणारी धमकी दिली आहे.
भारतीय वेळेनुसार पहाटे ५:१४ वाजता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ अकाउंटवरून इराणला थेट चेतावणी दिली. ट्रम्प यांनी म्हटले की, “इराणकडे आतापासून केवळ ४८ तास आहेत. जर त्यांनी कोणत्याही अटीशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर अमेरिका त्यांच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पांवर हल्ले करून ते पूर्णपणे उद्ध्वस्त करेल.” हा अल्टिमेटम २४ मार्च रोजी पहाटे ५:१४ वाजता संपणार आहे. इराणने याकडे दुर्लक्ष केल्यास तेहरानसह संपूर्ण इराण अंधारात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : अमेरिका 172 दशलक्ष बॅरल तेल बाजारात आणणार; इराणच्या मुसक्या आवळण्यासाठी वापरणार ‘ही’ रणनीती
इराणने यापूर्वीच इस्रायलच्या दिमोना आणि अराद या शहरांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. दिमोना हे ठिकाण इस्रायलच्या मुख्य अणुसुविधेसाठी ओळखले जाते. या हल्ल्यात १०० हून अधिक लोक जखमी झाले असून, अनेक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. नतान्झ अणुसुविधेवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र, इस्रायलने दिमोनासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेला हा हल्ला गांभीर्याने घेतला असून, अमेरिकेने आता या संघर्षात थेट उडी घेतली आहे.
🚨 “If Iran doesn’t FULLY OPEN, WITHOUT THREAT, the Strait of Hormuz, within 48 HOURS from this exact point in time, the United States of America will hit and obliterate their various POWER PLANTS, STARTING WITH THE BIGGEST ONE FIRST…” – President DONALD J. TRUMP pic.twitter.com/htLz1A0Mf7 — The White House (@WhiteHouse) March 22, 2026
credit – social media and Twitter
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची जलवाहतूक मार्ग आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के तेल याच मार्गातून वाहते. इराणने या मार्गाची नाकेबंदी केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अमेरिकेत काही महिन्यांतच निवडणुका आहेत आणि वाढती इंधन दरवाढ ट्रम्प यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या घातक ठरू शकते. त्यामुळेच ट्रम्प यांनी आता ‘आर-पार’ची लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
ट्रम्प यांनी इराणच्या ‘एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर’ला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. जर इराणचे वीज प्रकल्प नष्ट झाले, तर केवळ उद्योगधंदेच नाही, तर त्यांचे लष्करी दळणवळण आणि संरक्षण यंत्रणाही कोलमडून पडेल. इराणचे सर्वात मोठे वीज प्रकल्प कोणते आहेत हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नसले तरी, तज्ज्ञांच्या मते ‘बुशहर’ सारखी ठिकाणे अमेरिकेच्या रडारवर असू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crude Oil: ‘तुमची सवलत तुमच्याकडेच ठेवा’ ट्रम्पच्या ‘ऑईल गेमवर’ इराणची गुगली; 30 दिवसांच्या ऑफरला म्हटलं ‘खोटी आशा’
आता संपूर्ण जगाचे लक्ष २४ मार्चच्या त्या वेळेकडे लागले आहे. इराण ट्रम्प यांच्या धमकीपुढे झुकणार की होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवून युद्धाला निमंत्रण देणार? जर ही सामुद्रधुनी उघडली नाही, तर अमेरिका आणि इराणमधील थेट संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेला खिळ घालू शकतो. भारत, युरोप आणि आशियाई देशांसाठी हा काळ अत्यंत कठीण असणार आहे.
Ans: हा अल्टिमेटम २४ मार्च २०२६ रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ५:१४ वाजता संपणार आहे.
Ans: जगातील २०% तेल पुरवठा याच मार्गातून होतो. याची नाकेबंदी झाल्यास जगभरात इंधन टंचाई आणि महागाई प्रचंड वाढते.
Ans: इराणच्या नतान्झ अणुसुविधेवर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने इस्रायलच्या दिमोना आणि अराद शहरांवर क्षेपणास्त्र माऱ्या केला.






