कझानमध्ये पंतप्रधान मोदी आणि मसूद पेझेश्कियान यांची द्विपक्षीय बैठक; 'या' मुद्यांवर करण्यात आली चर्चा
कझान: पंतप्रधान नरेंद्र मोदी कझानमध्ये होणाऱ्या 16 व्या BRICS परिषदेसाठी पोहचले आहेत. यादरम्यान त्यांनी रशियाचे पंतप्रधान वॉल्दिमिर पुतिन तसेच चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्याशी द्वीपक्षीय बैठक घेतली. तसेच त्यांनी इराणचे अध्यक्षमसूद पेझेश्कियन यांच्यासोबत देखील महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पंतप्रधान मोदींनी भारत आणि इराण द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेतली. दोन्ही देशाच्या नेत्यांनी व्यापर, उर्जा आणि प्रादेशिकसुरक्षा क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
दोन्ही देशांमध्ये परस्पर हितसंबंध वाढवण्यावर भर
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आणि पेझेश्कियान यांनी परस्पर हितसंबंध वाढवण्यावर भर दिला. विशेषत: इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (INSTC) सारख्या प्रकल्पांद्वारे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी वचनबद्धता दर्शविली. ही बैठक दोन्ही देशांसाठी महत्त्वाच्या वेळी झाली. याशिवाय चाबहार बंदर आणि कनेक्टिव्हीटीवर देखील चर्चा करण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण कॉरिडॉर आणि पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याबाबत चर्चा केली.
पेजेश्कियां-मोदी यांची पहिली भेट
मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अफगाणिस्तानातील परिस्थितीवरही चर्चा केली. या बैठकीनंतर, इराणचे अध्यक्ष मसूद यांना पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेचा आपला अनुभव सांगताना म्हटले की, ‘खूप चांगले’ दोन्ही देशाच्या विकासांवर महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पंप्रधान मोदींसोबत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांची ही पहिलीच भेट आहे. इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढला असून पश्चिम आशियामध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना ही बैठक झाली आहे.
PM @narendramodi met President @drpezeshkian of Iran on the sidelines of 16th #BRICS2024 Summit in Kazan.
Discussions focused on 🇮🇳-🇮🇷 bilateral relations, including on the importance of INSTC and Chabahar port for regional connectivity.
PM raised concerns about the situation… pic.twitter.com/h9OUuqrgvz
— Randhir Jaiswal (@MEAIndia) October 22, 2024
भारताकडून मदतीची अपेक्षा आहे
अलीकडेच लेबनॉनवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाहचा मृत्यू झाल्यानंतर इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. या घटनेनंतर तणावात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी पश्चिम आशियात वाढलेल्या तणावादरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. अलीकडच्या काही दिवसांत दोन्ही देशांकडून यासंदर्भातील वक्तव्ये आली असून, या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून कझान येथे आयोजित 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान सहभागी झाले आहेत.