Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनची उडाली झोप! Modi-Trump यांच्यात ‘पॅक्स सिलिका’ करार; भारत बनणार जगातील AI सुपरपॉवर

India US Strategic AI Partnership : भारत आणि अमेरिकेने पॅक्स सिलिका करारांतर्गत AI भागीदाराची घोषणा केली आहे. या करारांतर्गत दोन्ही देशात सेमीकंडक्टर, उर्जा आणि संगणकीय क्षेत्रात सहकार्या वाढविण्यात येणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 09:38 AM
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या होणार बैठक

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या होणार बैठक

Follow Us
Follow Us:
  • भारत-अमेरिकेत पॅक्स सिलिका करारांतर्गत AI व सेमीकंडक्टर क्षेत्रात भागीदारी
  • संशोधन, गुंतवणूक आणि कुशल मनुष्यबळ विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट्य
  • पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या संयुक्त करारावर पुढाकार
India US AI Partnership : वॉशिंग्टन/ नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेत एक मोठा करार करण्यात आला आहे. ज्यामुळे भारत जागातील AI सुपरपॉवर देश बनणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने दोन्ही देशांत एआय भागीदारीची घोषणा करण्यात आली आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या तांत्रिक सहकार्याला चालना मिळणार आहे. ट्रम्प यांच्या पॅक्स सिलिका आराखड्याचा हा करारा भाग असणार आहे.

‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा

भारत-अमेरिका तांत्रिक सहकार्याचे नवे पर्व

पॅक्स सिलिका करारांतर्गत भारत आणि अमेरिकेत एआयच्या भागीदारीवर आधारित करार करण्यात आला आहे. याअंतर्गत खनिजे, सेमीकंडक्टर उत्पादनांवर भर देण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या उर्जा गरजा आणि संगणकीय क्षमतेला अधिक चालना मिळेल. यामध्ये केवळ एआयचा विकासच नव्हे, तर दोन्ही देशांत विश्वासार्ह आणि मुक्त व्यापार तत्वांवर आधारित करार असून दोन्ही देशांमध्ये यावर सहमती झाली आहे.

ट्रस्ट इनिशिएटिव्ह आणि नेतृत्व

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी ट्रस्ट या उपक्रमाद्वारे दोन्हीदेशांचे धोरणात्मक संबंध लक्षणीरित्या मजबूत केले आहेत.दोन्ही देश एआयला मानवतेच्या प्रगतीसाठी एक मोठी संधी म्हणून पाहत आहे. दोन्ही देशांच्या मते एआय मानवासाठी धोकादायक नसून लोकशाही देशांनी त्याचे नेतृत्व करणे आह.

भारत आणि अमेरिकेत या करारांतर्गत संशोधन आणि विकास उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे. दोन्ही देशांत कुशल मनुष्यबळ, शैक्षणिक आणि तांत्रिक प्रशिक्षणचा विस्तार केला जाणार आहे. एक विश्वासार्ह सेमीकंडक्टर इकोसिस्टम देखील तयार करण्याचे या करारांतर्गत उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या भागीदारीला यशस्वी करण्यासाठी खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. दोन्ही देश सीमापार व्हेंचर कॅपिटल प्रवाह आणि पुढच्या पिढीच्या डेटा सेंटर्समधील गुंतवणूक वाढीसाठी काम करणार आहेत. यामुळे स्टार्टअप्स आणि डेव्हलपर्सना एआय प्रणाली जागतिक स्तरावर विकसित करण्याची संधी मिळेल. दोन्ही देशांमधील हा करार लोकशाही मूल्याचा भाग आहे. दोन्ही देशांनी समृद्धीच्या मार्गावर एकत्रित सहकार्याचे वचन दिले आहे.

काय आहे पॅक्स सिलिका करार?

हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक धोरणात्मक आंतरराष्ट्रीय पुढाकार आहे.  या करारांतर्गत दोन्ही देशांत केवळ आर्थिक प्रगतीच नव्हे, तर जागतिक शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी एआय करार करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सेमीकंडक्टरसाठी लागणारी पुरवठा साखळी (Supply Chain) सुरक्षित आणि मजबूत ठेवण्याचा या कराराचा उद्देश आहे.

ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा! अमेरिकेने Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप हटवला; ड्रॅगनला घाबरली महासत्ता?

Web Title: Modi trump sign pax silica agreement india will become worlds ai superpower

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Donald Trump
  • India-US trade deal
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’
1

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस
2

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?
3

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट
4

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.