'भारत एक प्रयोगशाळा...', बिल गेट्स यांचे वादग्रस्त विधान; सोशल मीडियावर टिकांचा भडिमार
नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भारताबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे त्यांच्या विधानावरुन वाद निर्णाण झाला असून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. बिलगेट्स यांनी लिंक्डइचे सह-संस्थापक रीड हॉफमॅन यांच्या सोबत एका पॉडकास्टमध्ये भारताला प्रयोग करण्याची प्रयोगशाळी असे संबोधले आहे. त्यांच्या या विधानानने संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानामुळे 2009 मध्ये भारतात झालेल्या एका वादग्रस्त क्लिनिकल ट्रायलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे.
भारत एक प्रकारची प्रयोगशाळा
मिळालेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये झालेल्या या ट्रायलमध्ये गेट्स फाउंडेशनच्या निधीमधून करण्यात आलेल्या चाचणीदरम्यान 7 आदीवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झालो होता तर अनेकजण गंभीर आजारी पडले होते. बिलग्टेस यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, “भारत एक असा देश आहे, जिथे अनेक गोष्टी कठीण आहेत, परंतु आरोग्य, पोषण आणि शिक्षमध्ये सुधारणा होत आहे.
तसेच भारत सरकारने आपले उत्पन्न बळकट केले आहे. यामुळे 20 वर्षानी भारतातील नागरिक चांगल्या परिस्थितीत असेल.” तसेच त्यांनी असेही म्हटले आहे की, भारत एक प्रकारची प्रयोगशाळा आहे. जिथे अनेक गोष्टींचे प्रयोग केले जाऊ शकतात आणि यशस्वी झाल्यास इतर देशांत त्यांची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
“It’s a kind of laboratory to try things. When proven in India, they can then be taken to other places.”
— Bill Gates on India.In 2009, the American NGO PATH (Program for Appropriate Technology in Health), in collaboration with the ICMR, conducted clinical trials of a cervical… pic.twitter.com/66aFVrxCiM
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) December 2, 2024
सोशल मीडियावर टिकांचा भडिमार
बिल गेट्स यांच्या या विधानावर सोशल मीडियावर टीका झाली. “द स्किन डॉक्टर” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्कॉटलंडमधील एका डॉक्टरने त्यांच्या विधानाचा उल्लेख करत 2009 च्या वादग्रस्त क्लिनिकल ट्रायलबद्दल सांगितले. या ट्रायलमध्ये तेलंगणाच्या खम्मम आणि गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील 14,000 आदिवासी मुलींवर सर्व्हायकल कॅन्सरच्या लसीसाठी चाचणी घेण्यात आली होती. काही महिन्यांतच गंभीर दुष्परिणाम जाणवू लागले आणि 7 मुलींचा मृत्यू झाला. मात्र, या मृत्यूंना नैसर्गिक कारणे मानले गेले.
चाचणीत मोठ्या प्रमाणावर नैतिकतेचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले. या चाचण्यांना सार्वजनिक आरोग्य उपक्रम म्हणून सादर करण्यात आले आणि त्यांचा प्रयोगात्मक स्वरूप लपवण्यात आला. चाचणीसाठी आवश्यक असलेल्या परवानगीचे फॉर्म मुलींच्या पालकांकडून न घेतले जाऊन त्यांच्या वॉर्डनने स्वाक्षरी केली होती. यामुळे मुलींच्या कुटुंबीयांना या चाचणीच्या जोखमांबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.