Breaking Latest World News International News Headlines Live updates News in marathi
International breaking Live News Marathi : इस्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये हल्ले सुरू केल्यानंतर 700 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि. 24 मार्च 2025) इस्रायली सैन्याने गाझामधील नासेर हॉस्पिटलवर हल्ला केला, ज्यात हमास नेता इस्माईल बारहौमसह किमान दोन जण ठार झाले. इस्माईलची हत्या इस्रायली सैन्याने गाझाच्या अल-मवासी येथील तंबूवर बॉम्बफेक केल्यानंतर आणि हमासच्या राजकीय ब्युरोचे आणखी एक सदस्य सलाह अल-बरदाविल यांना ठार मारल्यानंतर काही तासांनंतर झाली. दिवसभरातील सर्व अपडेट्स खाली वाचा…
24 Mar 2025 04:14 PM (IST)
एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्ये 25 भारतीय नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे असून अद्याप या लोकांना फाशी देण्यात आलेली नाही. भारतीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी ही माहिती दिली. कीर्ति वर्धन सिंह यांनी परदेशात तुरुंगात असलेल्या भारतीय कैद्यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 10 हजार 152 भारतीय कैदी तुरुंगात असून त्यांच्या विविध आरोपांखाली खटला सुरु आहे. वेगवेगळ्या देशाच्या तुरुंगात हे भारतीय कैदी आहेत.
24 Mar 2025 03:16 PM (IST)
जगप्रसिद्ध क्राफ्टिंग युट्युबर डोना जॉर्डन यांचे 14 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने लाखो चाहत्यांना धक्का बसला असून, त्यांच्या पतीने एका भावूक व्हिडिओद्वारे ही दुःखद बातमी जाहीर केली. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ नेहमीच्या क्विल्टिंग ट्यूटोरियलप्रमाणेच सुरू झाला, मात्र 12 मिनिटांनंतर आलेल्या घोषणेमुळे अनेकांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या. डोना जॉर्डन या क्विल्टिंग आणि क्राफ्टिंगच्या दुनियेत एक मोठे नाव होत्या. त्यांच्या अनोख्या ट्यूटोरियलमुळे जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा मिळाली होती. त्यांचे YouTube चॅनेल ‘जॉर्डन फॅब्रिक्स’ हे क्राफ्टिंगप्रेमींसाठी एक आदर्श मंच बनले होते. त्यांच्या चॅनेलवर तब्बल 7.10 लाख फॉलोअर्स होते आणि त्यांनी शेकडो व्हिडिओ तयार केले होते, ज्यांना लाखो-कोट्यवधी व्ह्यूज मिळाले होते.
24 Mar 2025 02:23 PM (IST)
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना रविवारी (23 मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या पाच आठवड्यांहून अधिका काळ ते रुग्णालयात गंभीर अवस्थेत होते. दरम्यान त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांनी प्रथमच लोकांना सावर्जनिक दर्शन दिले. रोममधील जेमेली रुग्णालयातून त्यांनी लोकांचे अभिवादन केले. फ्रान्सिस यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया झाला होता. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांनी भेटायला आलेल्या लोकांना “धन्यवाद” म्हटले. लोकांनी केलेल्या प्रार्थनांचे त्यांनी आभार मानले. पोप यांना बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती.
24 Mar 2025 01:55 PM (IST)
अफगाणिस्तानमधून काही मुलांनी बेकायदीशरीपणे पाकिस्तानात घुसखोरी केली होती. या 53 मुलांना परत त्यांच्या देशात अफगाणमध्ये पाठवण्यात आले आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसा, रविवारी (23 मार्च) या मुलांनी पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या तोखरोम सीमारेषेजवळील तारा कापून घुसखोरी केली. कामाच्या शोधात ही मुले पाकिस्तानमध्ये गेली होती. दरम्यान सीमारेषेवरील तैनात लष्करी अधिकाऱ्यांना या मुलांना परत पाठवम्यास मदत केली. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाण मुलांचे पाकिस्तानात येण्याचे प्रयत्न दिवसेंदिवस वाढत आहेत.
24 Mar 2025 12:51 PM (IST)
सध्या रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. जागतिक स्तरावर दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये अमेरिकेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. दरम्यान 30 दिवसांच्या युद्धबंदीवर दोन्ही देशांनी समहमती दर्शवली होती, मात्र रशियाने यूक्रेन हल्ला करत त्यांचा यूद्ध संपवण्याचा कोणताही हेतू नाही हे स्पष्ट दाखवून दिले. दरम्यान रशियाने रविवारी (23 मार्च) यूक्रेनवर 150 ड्रोन हल्ले केले. याहल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. दरम्यान, रशियाने या आठवड्यात यूक्रेनवर हजारहून अधिक गाईडेड बॉम्ब हल्ले केले आहेत, अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत.
24 Mar 2025 12:28 PM (IST)
सध्या नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये राजेशाही समर्थनार्थ आंदोलने सुरु झाली आहेत. यामुळे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची चिंता वाढली आहे. नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागतासाठी आणि राजेशाही समर्थनार्थ नेपाळची राजधानी काठमांडू येथे मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. या आंदोलनात भारताची महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने भारत-नेपाळ संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
24 Mar 2025 12:01 PM (IST)
जगातील सर्वात लहान शेळी केरळमधील एका शेतकऱ्याच्या मालकीची आहे. या शेळीची जगातील सर्वात लहान जिवंत शेळी म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्याचा मालक पीटर लेनूला माहित होते की त्याची शेळी करुंबी खूपच लहान आहे. लोकांनी गिनीज बुकमध्ये आपले नाव नोंदवण्याचा प्रयत्न करावा असे सुचविल्यानंतर त्यांनी ही प्रक्रिया पुढे नेली.
Aye, Karumbi! World’s shortest living goat in India is adorable and only one foot tallhttps://t.co/qbQd7rMvaN
— Guinness World Records (@GWR) March 21, 2025
credit : social media
24 Mar 2025 11:46 AM (IST)
अलास्कामधील प्रसिद्ध आणि प्रचंड ज्वालामुखी माउंट स्पर लवकरच उद्रेक होण्याच्या मार्गावर असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. या ज्वालामुखीवर सातत्याने नजर ठेवणाऱ्या अलास्का ज्वालामुखी वेधशाळेने (AVO) दिलेल्या माहितीनुसार, या ज्वालामुखीचा उद्रेक आठवडाभरात होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात राख आणि लाव्हारस बाहेर पडू शकतो.
Eruption at Alaska's Mount Spurr is likely, and scientists say preparations should begin https://t.co/gEsfwFwjbQ via @nbcnews
— Morgan Chesky (@BreakingChesky) March 21, 2025
credit : social media
24 Mar 2025 11:10 AM (IST)
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वन्स यांच्या पत्नी उषा वन्स गुरुवारी (27 मार्च 2025) ग्रीनलँडला भेट देणार आहेत. यूएस व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्ज आणि ऊर्जा सचिव ख्रिस राइट यांच्यासह एक अमेरिकन शिष्टमंडळ ग्रीनलँडला भेट देणार आहे. या हायप्रोफाईल ग्रीनलँड दौऱ्यात अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या पत्नीही त्यांच्यासोबत असतील.
24 Mar 2025 10:41 AM (IST)
दक्षिण कोरियाच्या संवैधानिक न्यायालयाने सोमवारी (24 मार्च 2025) पंतप्रधान हान डुक-सू यांचा महाभियोग फेटाळला. हा निर्णय देताना न्यायालयाने पंतप्रधानांना दक्षिण कोरियाचे हंगामी राष्ट्राध्यक्षपदही बहाल केले. देशात मार्शल लॉ लागू केल्याबद्दल राष्ट्रपतींना निलंबित केल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान हान डक-सू यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
#BREAKING South Korea court dismisses impeachment of prime minister, Yonhap reports pic.twitter.com/yPArTnlvBs
— AFP News Agency (@AFP) March 24, 2025
credit : social media
24 Mar 2025 10:27 AM (IST)
शास्त्रज्ञांनी ज्या ताऱ्यामध्ये हा स्फोट दिसला त्याला LMCN 1968-12a असे नाव दिले आहे. या तारेमध्ये यापूर्वीही अनेकदा स्फोट झाले आहेत. वास्तविक, LMC ही एक बटू आकाशगंगा आहे, जिथे धातूंची कमतरता आहे. अशा स्थितीत येथील छोटे तारे त्यांच्या सोबती मोठ्या ताऱ्यांकडून वायू काढतात. LMCN 1968-12a हेच करते. यामुळेच त्याचा स्फोट होत राहतो.
24 Mar 2025 10:09 AM (IST)
गेल्या आठवड्यात इस्रायली सैन्याने जाहीर केले की त्यांनी नेत्झारिम कॉरिडॉरचा काही भाग पुन्हा ताब्यात घेतला आहे. नेत्झारिम कॉरिडॉर दक्षिण आणि उत्तर गाझा वेगळे करतो. जानेवारीमध्ये युद्धविरामाच्या सुरुवातीला या कॉरिडॉरमधून सैन्याने माघार घेतली होती. तेथे उपस्थित असलेल्या हजारो पॅलेस्टिनींना आता घरी परतल्यानंतर काही आठवड्यांनंतर मोठ्या प्रमाणावर स्थलांतराच्या आदेशांचा सामना करावा लागत आहे.
24 Mar 2025 09:49 AM (IST)
UNICEFच्या प्रवक्त्या रोसालिया बोलान यांनी सांगितले की, इस्त्रायलच्या गाझामध्ये रफाह आणि बीट हानौनसह नवीन सक्तीचे विस्थापन आदेश तेथील कुटुंबांच्या "खोल दुःखात" भर घालत आहेत. इस्रायलमध्ये हजारो इस्रायलींनी पश्चिम जेरुसलेममधील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला आणि त्यांनी गाझा युद्धविराम कराराकडे परत जाण्याची मागणी केली.
“Children who have been traumatized and deeply scarred by 15 months of war are now again exposed to this violence.”
UNICEF’s Rosalia Bollen reports in the aftermath of the attacks in Gaza.
We appeal for the ceasefire to be reinstated immediately. pic.twitter.com/AWHWC2JFC2
— UNICEF (@UNICEF) March 18, 2025
credit : social media