Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : सौदी अरेबियावर हुतींचा जोरदार मिसाइल-ड्रोन हल्ला! ‘लष्करी कारवाया थांबवा, नाहीतर हल्ले आणखी वाढवू’

Breaking News : येमेनमधील हुती बंडखोरांनी दक्षिण सौदी अरेबियातील लष्करी ठिकाणाला क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. हुतींचे प्रवक्ते याह्या सारी यांनी येमेनमधील सौदीच्या लष्करी कारवाया सुरू राहिल्यास सौदी अरेबियावर आणखी मोठे हल्ले केले जातील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढला आहे

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 14, 2026 | 05:30 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • डझनभर बॅलिस्टिक मिसाइल आणि ड्रोन
  • येमेनमधील संघर्ष पुन्हा भडकला
  • हल्ले थांबवा, नाहीतर परिणाम भोगा
Breaking News : येमेनमधील संघर्ष पुन्हा एकदा गंभीर वळणावर पोहोचला आहे. हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील लष्करी आणि महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर केल्याचा दावा केला आहे. हुतींचे लष्करी प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी सौदी अरेबियावर आणखी व्यापक हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. येमेनमध्ये सौदीकडून सुरू असलेल्या लष्करी कारवाया थांबल्या नाहीत, तर पुढील हल्ले अधिक मोठ्या प्रमाणावर केले जातील, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

डझनभर बॅलिस्टिक मिसाइल आणि ड्रोन

याह्या सारी यांच्या म्हणण्यानुसार, हुतींनी दक्षिण सौदी अरेबियातील किंग खालिद एअर बेसला लक्ष्य करण्यासाठी डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. हुतींकडून सौदीतील लष्करी ठिकाणे आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचा सिलसिला सुरू आहे.

या हल्ल्यांमागे येमेनमध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील कारवायांना प्रत्युत्तर देण्याचा उद्देश असल्याचे हुतींकडून सांगण्यात आले आहे. मात्र, हल्ल्यामुळे नेमके किती नुकसान झाले किंवा सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचले का, याबाबत स्वतंत्रपणे संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.

Africa IPO : डांगोटे रिफायनरीचा विक्रमी IPO! आफ्रिकेतील सर्वात मोठ्या शेअर विक्रीतून उभारणार अब्जावधी डॉलर

येमेनमधील संघर्ष पुन्हा भडकला

येमेनमध्ये सरकारी सैन्य आणि हुती बंडखोरांमधील संघर्ष अलीकडच्या काळात पुन्हा तीव्र झाला आहे. सौदी अरेबिया येमेनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारला पाठिंबा देत आहे, तर हुती बंडखोर देशातील मोठ्या भागावर प्रभाव राखून आहेत.

रेड सी किनाऱ्यावरील भाग आणि बाब-अल-मंदेब या महत्त्वाच्या सागरी मार्गाजवळील हालचालींमुळे संघर्षाला आणखी गंभीर स्वरूप आले आहे. या भागातून आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे येमेनमधील संघर्षाचा परिणाम केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही.

Israel News : ‘NAZA’ चित्रपटाचा वाद पेटला! दिग्दर्शकांचे नागरिकत्व रद्द करण्याची इस्रायली मंत्र्यांची मागणी

‘हल्ले थांबवा, नाहीतर परिणाम भोगा’

याह्या सारी यांनी सौदी अरेबियाला थेट इशारा देताना येमेनमधील लष्करी कारवाया सुरू राहिल्यास सौदीवरील हल्ल्यांची व्याप्ती आणखी वाढवली जाईल, असे म्हटले आहे. यामुळे सौदी अरेबिया आणि हुती यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या वाढत्या तणावामुळे सौदीची तेल पायाभूत सुविधा, लाल समुद्रातील जहाज वाहतूक आणि संपूर्ण मध्यपूर्वेतील सुरक्षेवर परिणाम होण्याची भीती आहे. आधीच या भागातील संघर्षामुळे ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे. त्यामुळे हुतींच्या नव्या धमकीनंतर सौदी अरेबिया कोणती भूमिका घेतो आणि येमेनमध्ये पुढील लष्करी कारवाया कशा होतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Breaking news houthis launch massive missile and drone attack on saudi arabia halt military operations or we will escalate the attacks further

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Attack
  • Drone
  • Houthi
  • Saudi Arabia
  • yemen

संबंधित बातम्या

Saudi Arabia : मध्य पूर्वेत नवे राजकीय समीकरण; हुथींविरुद्धच्या लढ्यात सौदी अरेबियाने मागितली इस्रायलची अप्रत्यक्ष मदत
1

Saudi Arabia : मध्य पूर्वेत नवे राजकीय समीकरण; हुथींविरुद्धच्या लढ्यात सौदी अरेबियाने मागितली इस्रायलची अप्रत्यक्ष मदत

‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ आधीपासूनच बंद; आता भारतावर येणार ‘हे’ नवे संकट
2

‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ आधीपासूनच बंद; आता भारतावर येणार ‘हे’ नवे संकट

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची १,२०० किमी तेलवाहिनी बंद; जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा धोका
3

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची १,२०० किमी तेलवाहिनी बंद; जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा धोका

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
4

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.