
फोटो सौजन्य AI
शी जिनपिंग यांनी तैवानचा प्रश्न हा चीनच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले . चीनच्या भूमिकेनुसार तैवान हा चीनचा भाग आहे . आणि त्याचे अंतिम एकीकरण हा बीजिंगच्या धोरणातील महत्वाचा मुद्दा आहे . त्यामुळे अमेरिकेने तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ नये . तसेच तैवानच्या सुरक्षेची जबाबदारी ही घेऊ नये .
अशी चीनची अपेक्षा आहे . अमेरिका आणि चीनमध्ये तैवानच्या प्रश्नावर यापूर्वीही अनेकदा मतभेद झालेत . तैवान स्वतःचे सरकार , निवडणूक व्यवस्था आणि प्रशासन चालवत असला तरी चीन त्यावर आपला दावा कायम ठेवतो . त्यामुळे तैवानचा मुद्दा महासत्तांमधील सर्वात संवेदनशील विषयांपैकी एक मानला जातो .
UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले
ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या बैठकीनंतर तैवानच्या मुद्द्यावर अमेरिकेची नेमकी भूमिका काय असेल , याकडे लक्ष लागले आहे . अमेरिकेचे तैवानसोबत औपचारिक राजनैतिक संबंध नसले तरी दोन्ही देशांमध्ये मजबूत अनौपचारिक संबंध आहेत . अमेरिका तैवानला सुरक्षा शस्त्र साहित्य पुरवते आणि त्याच्या सुरक्षेला महत्व देते .
मात्र ट्रम्प प्रशासन चीनसोबत व्यापार आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करत असल्याने तैवानबाबत अमेरिकेची भूमिका संतुलित ठेवण्याचे आव्हान कायम आहे . बैठकीत तैवानचा मुद्दा उपस्थित झाल्याने अमेरिका – चीन संबंधांमधील हा संवेदनशील विषय पुन्हा चर्चेत आला आहे .
World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
तैवानच्या भवितव्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये अनेक वर्षांपासून तणाव आहे . चीनने तैवानच्या स्वातंत्र्याच्या कोणत्याही औपचारिक घोषणेला विरोध केला आहे . दुसरीकडे तैवानमध्ये चीनसोबतच्या संबंधांबाबत वेगवेगळी मते आहेत आणि बेटाचे प्रशासन स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेते .
ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या बैठकीत आर्थिक आणि व्यापारविषयक मुद्यांसोबत तैवानचा प्रश्नही महत्वाचा ठरल्याने पुढील काळात या मुद्द्यावर दोन्ही देशांची भूमिका कशी विकसित होते याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष राहणार आहे . तैवानचा प्रश्न केवळ चीन आणि तैवानपुरता मर्यादित नसून त्यात अमेरिकेच्या आशिया पॅसिफिक धोरणाचाही महत्वाचा भाग जोडलेला आहे .