Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Breaking News : नेतन्याहूंची सत्ता उलथवण्याची तयारी; आयझेनकोट यांच्यासमोर सरकार स्थापनेचे आव्हान

Israel Breaking News : इस्रायलचे माजी लष्करप्रमुख गादी आयसेनकोट यांच्याकडे नवे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नेतन्याहू यांच्या मित्रपक्षांशी चर्चा सुरू असून बहुमत मिळवण्यासाठी त्यांना मोठी राजकीय कसरत करावी लागणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 09, 2026 | 08:57 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्राध्यक्षाकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण; मिळाले २८ दिवस
  • नेतन्याहूंच्या मित्रपक्षांशी संपर्क; सत्तांतरासाठी प्रयत्न
  • इस्रायल ऐतेहासिक संकटाच्या उंबरठ्यावर
Israel Breaking News : इस्रायलच्या राजकारणात सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे . माजी लष्करप्रमुख आणि याशार पक्षाचे नेते गादी आयझेनकोट यांनी नवे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत . सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या दीर्घकालीन सत्तेला आव्हान देत त्यांनी राजकीय पक्षांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे .

इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी आयझेनकोट यांच्यावर सत्ता स्थापनेची जबाबदारी सोपवली आहे . त्यांनी नेतान्याहू पेक्षा जास्त पसंती आयझेनकोट यांना दिली आहे . मात्र या निवडणुकीत संसदेत स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांच्यासमोर मित्रपक्षांची जुळवाजुळव करण्याचे मोठे आव्हान आहे .

राष्ट्राध्यक्षाकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण; मिळाले २८ दिवस

इस्रायलमध्ये २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही . त्यानंतर राष्ट्राध्यक्ष आयझॅक यांनी इतर अनेक पक्षांशी चर्चा केली . या चर्चेत ६७ खासदारांनी आयझेनकोट यांना सरकार स्थापन करण्यासाठी संधी द्यावी अशी शिफारस केली , तर ४६ खासदारांनी नेतान्याहू यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली .

अखेर ८ नोव्हेंबर रोजी आयझेनकोट यांच्याकडे सरकार स्थापनेची अधिकृत जबाबदारी सोपवण्यात आली . त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी २८ दिवसांची मुदत देण्यात आली असून , आवश्यक असल्यास आणखी १४ दिवसांची मुदतवाढ मिळू शकते . असे समजते आहे .

World Finance News : शांत बसतील ते ट्रम्प कसले; प्रशासनाचा ‘परप फ्युचर्स’ला हिरवा कंदील; आर्थिक बाजारात संघर्षाची चिन्हे

नेतन्याहूंच्या मित्रपक्षांशी संपर्क; सत्तांतरासाठी प्रयत्न

आयसेनकोट यांनी सरकार स्थापनेसाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षातील खासदारांसह अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांच्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या पक्षालाही सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मात्र, नव्या सरकारचे नेतृत्व स्वतःकडेच राहील, अशी त्यांची भूमिका आहे. आयसेनकोट यांच्या आघाडीकडे सध्या ४८ जागा असून बहुमतासाठी १२० सदस्यांच्या संसदेत किमान ६१ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे अरब पक्षांचा पाठिंबा मिळवणे किंवा नेतन्याहू यांच्या गटातील काही पक्षांना सोबत घेणे, असे पर्याय त्यांच्यासमोर आहेत.

Climate Change News : जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि महापूर, हवामान बदलाचा धोका; जागतिक नेते एकत्र येणार

इस्रायल ऐतेहासिक संकटाच्या उंबरठ्यावर

सरकार स्थापनेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आयझेनकोट यांनी इस्रायलच्या सध्याच्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे . नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखाली देश एका गंभीर राजकीय संकटात सापडला आहे . आंतराष्ट्रीय स्तरावर जवळच्या मित्र राष्ट्रांचाही विश्वास कमी होत चालला आहे .

या देशाला यातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणीचे सरकार स्थापन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे . याचदरम्यान अरब पक्षांचा पाठिंबा , धार्मिक पक्षांच्या अटी आणि लिकुडमधील वाटणारी फूट यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग सोप्पा नसणार आहे . यामुळे इस्रायलमधील आगामी राजकीय घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे .

Web Title: Israel gadi eisenkot government formation cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • Marathi News

संबंधित बातम्या

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी
1

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.
2

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.

Pune Metro News : पुणे मेट्रो लाइन ३ साठी सीमेन्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान; हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी हो
3

Pune Metro News : पुणे मेट्रो लाइन ३ साठी सीमेन्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान; हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी हो

World Finance News :शांत बसतील ते ट्रम्प कसले; प्रशासनाचा ‘परप फ्युचर्स’ला हिरवा कंदील; आर्थिक बाजारात संघर्षाची चिन्हे
4

World Finance News :शांत बसतील ते ट्रम्प कसले; प्रशासनाचा ‘परप फ्युचर्स’ला हिरवा कंदील; आर्थिक बाजारात संघर्षाची चिन्हे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.